पतीने केला कुऱ्हाडीने वार,पत्नी झाली जागेवर ठार!,

*पतीने केला कुऱ्हाडीने वार*,
*पत्नी झाली जागेवर ठार!*,
*अकोला जिल्ह्यातील तळेगाव बाजार येथील थरकाप आणून सोडणारी घटना!*
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी
हिवरखेड दि.१९ : अकोला जिल्ह्यातील थरकाप आणून सोडणारी घटना तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तळेगाव बाजारच्या शेत शिवारातील असून एका महिलेची तिच्याच शेतात निघृण हत्या केल्याची हृदयद्रावक हि घटना आहे.
सविस्तर वृत्त असे की दनोरी येथील माहेर असलेली महिला हिचा विवाह तळेगाव बाजार तालुका तेल्हारा येथील गजानन ढोले यांच्याशी झालेला होता. परंतु त्यांच्यात शेती व कौटुंबिक वाद असल्यामुळे सदर महिला मागील तीन ते चार वर्षांपासून आपल्या माहेरी दनोरी येथे राहत होती. सदर महिलेची तळेगाव येथे शेती असल्याने दनोरी येथील महिलेचा भाऊ श्याम वाघमारे याचेकडे कामावर असलेला युवक ऋत्विक संजय रोहनकार याला सोबत घेऊन ती महिला तळेगावची शेती पाहण्यासाठी आली होती. दोघेही शेतात झाडाच्या सावली खाली बसले असताना महिलेचा पती गजानन ढोले व सासरे रामदास ढोले तेथे कुऱ्हाड घेऊन आले आणि महिलेसोबत वाद घातला आणि महिलेवर कुऱ्हाडीने वार केला त्या हल्ल्यात पत्नी जागेवरच ठार झाली! अचानक झालेला हमला पाहून सोबत असलेला ऋत्विक याने महिलेला वाचविण्यासाठी प्रयत्न केला असता आरोपीने प्रथम त्याला दोन-तीन ठिकाणी जबर चावा घेतला आणि त्याला काठ्यांनी मारहाण केली.
महिलेची हत्या केल्यानंतर प्रत्यक्षदर्शी युवकाला संपविण्याचा सुद्धा आरोपींनी प्रयत्न केला. परंतु त्या प्रत्यक्षदर्शी युवकाने समय सूचकता बाळगत कसातरी आपला जीव वाचविला. विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार सुरक्षित स्थळी पोहोचल्यावर ऋत्विक ने सर्व घटनाक्रम महिलेच्या भावाला भ्रमणध्वनी च्या माध्यमातून संपर्क करून सांगितला. त्यानंतर प्रत्यक्षदर्शी युवक व महिलेच्या भावाने हिवरखेड पोलीस स्टेशन येथे धाव घेऊन सर्व घटनाक्रम पोलिसांकडे कथन करून फिर्याद दिली.
वृत्त लिहिस्तोवर हिवरखेड पोलिसांची गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मृतक रेणुका हिला एक नऊ वर्षाचा मुलगा असून तो सुद्धा मामाकडे दनोरीला राहतो. अकोला जिल्ह्यातील तळेगाव बाजार येथील थरकाप आणून सोडणारी घटना!




