Uncategorized

थोर पाणी पाड्यातील मृतांच्या नातेवाईकांचे डॉ केतकी ताई पाटील यांच्याद्वारे सांत्वन

जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीद्वारे जोपासली माणुसकी

जळगाव – यावल तालुक्यातील थोर पाणी या आदिवासी पाड्यावर मागील आठवड्यात झालेल्या वादळात एका पावरा कुटुंबातील चार जणांचा दूर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली. आज घटनास्थळी गोदावरी फाऊंडेशन संचालिका तथा भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा, जळगाव जिल्हा पूर्व, पश्चिम आणि जळगाव महानगर महिला मोर्चा समन्वयिका डॉ केतकी ताई पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. या प्रसंगी मृत कुटुंबियांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले आणि एक महिना पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंची मदत करून माणुसकी जोपासली.

यावल तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेस लागून असलेल्या अति दुर्गम भागातील थोर पाणी या आदिवासी पाड्यावर घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच आदिवासी पावरा कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, ही घटना अतिशय दुःखद अशी आहे. या दुर्दैवी घटनेत पावरा कुटुंबातील नानसिंग गुलाब पावरा, सोनूबाई नानसिंग पावरा, रतिलाल नानसिंग पावरा आणि बालीबाई नानसिंग पावरा या चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या कुटुंबातील एक मुलगा शांतीलाल मानसिंग पावरा हा सुदैवाने बचावला. या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळलेल्या नातेवाईकाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन डॉ केतकी ताई पाटील यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती भरतभाऊ महाजन, भाजपा कार्यकर्ते राहुल पाटील, स्थानिक कार्यकर्ते सुरेश हट्टा पावरा, हट्टा रजन पावरा, बाला गुला पावरा, चिमा नांदला पावरा यांची उपस्थिती होती. या वेळी उपस्थित नागरिकांशी चर्चा करून पाड्यावरील प्रत्येकाला आरोग्य शिबिरांद्वारे आरोग्य सेवा पोहचविण्याचा मानस डॉ केतकी ताईंनी बोलून दाखविला.

श्वानामुळे बचावला बालक, मायेचा फिरवीला हात
टेकडीवरून जीव मुठीत घेऊन कुटुंबीय धावत असताना शांतीलाल हा बालक देखील धावत होता. अचानक काळाचा घाला आपल्या आई वडील, बहीण भावंडांवर झाल्याने त्याला उमजेना झाले. अखेरीस निष्ठावान श्वानाने बालकाला आपल्या मागे धावायला लावून मृत्यूच्या दाढेतून बाहेर ओढले. त्याबद्दल आज ३ जून रोजी डॉ केतकी ताई पाटील यांनी भेट देऊन बालकाच्या पाठीवरून मायेचा हात फिरविला आणि धीर दिला.

गौरी जोशी
जनसंपर्क विभाग,
डॉ केतकी ताई पाटील कार्यालय, जळगाव
९९६०५७७६९८

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button