बुलढाणामहाराष्ट्रसंपादकीय

संग्रामपूर तालुका पत्रकार संघाचा दुहेरी गौरव, राज्यस्तरीय विभागीय आदर्श पुरस्कारानंतर स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस कडून विशेष असा सन्मान…!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,

तालुका प्रतिनिधी संग्रामपूर, रतन भगत.
दि.७/४/२०२६. पत्रकारितेच्या क्षेत्रात सातत्यपूर्ण निष्ठावंत आणि प्रभावी कार्य करत मराठी पत्रकार परिषद संलग्निक रामपूर तालुका पत्रकार संघाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेमधून प्रदान करण्यात आलेल्या राज्यस्तरीय विभागीय आदर्श पुरस्काराने संग्रामपूर तालुका पत्रकार संघाच्या कार्याचा गौरव होताच या बहुमानाचे पुन्हा एकदा कौतुक व्हावे, यासाठी स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संघाचा विशेष असा सत्कार करण्यात आला. दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी शेगाव येथे पार पडलेल्या या भव्य दिव्य सोहळ्यात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संग्रामपूर तालुका पत्रकार संघाच्या कार्याचा विशेष असा उल्लेख करण्यात आला. मराठी पत्रकार परिषदे कडून मिळालेल्या विभागीय पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर संघाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक करत स्टार भारतच्या वतीने संघाला यांच्यावर आमंत्रित करण्यात आले. यावेळी तालुका पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील दांदळे, रामेश्वर गायकी, पंजाबराव ठाकरे, राजेंद्र धर्माधिकारी, स्वप्निल देशमुख ,शाम इंगळे, भगवान पाखरे ,नंदू पाटील खानझोड ,मोहन सोनवणे, रतन भगत, सतीश जंजाळ या सर्व उपस्थित पदाधिकारी व सदस्य यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थित आणि टाळ्यांच्या कडकडाटात या सन्मानाचे स्वागत करत संघाच्या कार्याची प्रशंशा केली. संग्रामपूर तालुका पत्रकार संघाने समाजातील विविध प्रश्नांना वाचापुढं प्रशासनाच्या कामकाजावर बारीक लक्ष ठेवत आणि सर्व सामान्यांच्या न्यायासाठी सातत्याने लढा देत पत्रकारितेचा खरा अर्थ जपला आहे. मराठी पत्रकार परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार आणि त्यानंतर स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस मिळालेला हा सन्मान संघाच्या कार्याची दखल घेतल्याचे धोतक आहे. संघाच्या दुहेरी गौरवामुळे संग्रामपूर तालुक्याचे नाव पत्रकारितेच्या क्षेत्रात अधिकच उंचावले गेले असून भविष्यातही सांगा कडून अशीच प्रभावी व जनहिताची पत्रकारिता अपेक्षित असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button