आट्यापाट्या खेळात महाराष्ट्राचा राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण विजय!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
संग्रामपुर तालुका प्रतिनिधी,
रतन भगत,
संग्रामपूर दि.५/१०/२६ सविस्तर वृत्त असे की तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे २ ते ४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान पार पडलेल्या ३३ वि मुले व २६ वि मुलींची सब ज्युनियर राष्ट्रीय आट्यापाट्या अजिंक्य स्पर्धा २०२६ मध्ये महाराष्ट्राच्या मुलांच्या आणि मुलींच्या अशा दोन्ही संघांनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर सुवर्णपदक पटकावत राष्ट्रीय विजेते पदाला गवसणी घातली आहे. या सुवर्ण विजयी मोहिमेत महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाचे नेतृत्व करण्याचा मान पळशी झाशी येथील सामाजिक कार्यकर्ते अभयसिंह मारोडे यांचा मुलगा विश्वजीत मारोडे याला मिळाला.
सोबतच संग्रामपूर तालुक्यातील सोहम ढोकणे, वीरेन मोहे, विश्वजीत मारोडे, आणि ग्राम जस्तगाव येथील सोहम इंगळे हे चार खेळाडू होते. त्याने कर्णधार म्हणून केलेले नेतृत्व आणि संपूर्ण संघाने दाखवलेली जिद्द शिस्त संघभावना व खेळा प्रती असलेली निष्ठा यांचा हा अभिमान अस्पद क्षण आहे. या युवा खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा नव्हे तर अख्या देशाचा अभिमान तसेच आपल्या राष्ट्रध्वजाचा तिरंगा अभिमानाने फडकवत आपल्या महाराष्ट्र राज्याची मान उंचावली आहे. हा विजय केवळ सुवर्णपदकाचा नाही तर कठोर परिश्रमांचा, सातत्यपूर्ण सरावाचा, प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचा आणि प्रत्येक खेळाडूच्या जिद्दीचा मेहनतीचा विजय आहे. या युवा खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर आपल्या महाराष्ट्र राज्याची मान उंचावलेली आहे. महाराष्ट्राच्या दोन्ही सुवर्ण विजयी संघातील सर्व खेळाडू, मार्गदर्शक प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि या यशासाठी योगदान देणाऱ्या विश्वजीत आणि त्याच्या संपूर्ण चॅम्पियन संघाला भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील महाराष्ट्राचा व देशाचा नावलौकिक वाढो म्हणून सर्व स्तरावरून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आणि यामध्ये विशेष सांगण्यासारखे असे आहे की दीपक इंगळे हा मुलगा जास्त गाव येथील ग्रामपंचायत सदस्य सौ नीता योगेश इंगळे यांचा मुलगा आहे. तसेच जास्त गाव ग्रामपंचायतचे सरपंच सौ विद्या सुमित डोसे अशा गुणवंत मुलांचा, मुलींचा सत्कार घेऊन त्यांचं मनोबल नेहमीच वाढवत असतात याचे एक उदाहरण म्हणजे येथीलच गव्हांदे यांची मुलगी ज्या वेळेस मुंबई पोलीस या पदावर तिची नियुक्ती झाली त्यावेळेस सुद्धा या जास्त गावच्या सरपंच सौ विद्या सुमित जोशी यांनी अशाच प्रकारे त्यांचे स्वागत घेऊन त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्याचाच परिणाम या नवीन पिढीवर होत असल्याचे चित्र समोर दिसत आहे.



