Uncategorized

हिवरखेड येथील सहदेवराव भोपळे विद्यालयातील दहावी बोर्ड परीक्षेची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ता.प्रतीनिधी विजय घोडे

हिवरखेड :-
हिवरखेड येथील महात्मा फुले शिक्षण संस्था द्वारा संचालित सहदेवराव भोपळे विद्यालयातील निकाल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्कृष्ट लागला आहे. यावर्षी दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी मराठी माध्यमाचे ६९ तर सेमी इंग्रजी मधून ६८ असे एकूण १३७ विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते.यात मराठी माध्यमाचा ९४.२० टक्के तर सेमी इंग्रजी चा १०० टक्के निकाल लागला आहे. दरवर्षी प्रमाणे विद्यालयाची दहावी परीक्षेचा उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखीत विद्यालयाचा एकूण निकाल ९७.०८ टक्के लागला आहे.

या निकालात प्राविण्य श्रेणीत ६३ तर प्रथम श्रेणीत ३२ विद्यार्थ्यांनी स्थान प्राप्त करून निकालात बाजी मारली आहे. सेमी इंग्रजी मधून गुणानुक्रमे प्रथम-कु.अनुजा अनिल पोके-९६.८०,द्वितीय- कु.सावनी अजय वैष्णव-९४.८०,तृतीय-कु.अंजली गोपाल ताले-९४.४०,चतुर्थ-सौम्या दिलीप बाळापुरे-९२.८०,पाचवा क्रमांक-कु.श्रेया रतन बाजारे-९२.६० व कु.तनुश्री श्रीकृष्ण ओरीवकर-९२.६० तसेच मराठी माध्यमातून कु.हर्षा सिद्धार्थ वाकोडे-८४.४०,कु.सुष्टी गजानन गायकी८४.००,जान्हवी विष्णू आडोळे-८२.६०, चि.आदित्य संजय टिप्परकार-८१.८०,चि. रोशन अतुल भगत-८१.६० टक्के गुण पटकावून विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीत भर टाकली आहे. या यशाबद्दल महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे, कार्यवाह श्यामशिल भोपळे, कोषाध्यक्ष पुखराज राठी व संस्थेचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ संचालक सत्यदेव गिऱ्हे यांच्यासह सर्व पदाधिकारी, संचालकगण, विभाग प्रमुख तथा सहकार्यवाह स्नेहल भोपळे,
प्राचार्य संतोषकुमार राऊत, पर्यवेक्षक गणेश खानझोडे, परीक्षा प्रमुख अभिजित भोपळे, आदी शाळेचे सर्व शिक्षक-शिक्षिका व कर्मचारी वृंद यांनी विद्यार्थ्यांचे यशाबद्दल कौतुक केले आहे. विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय पालक गण, मार्गदर्शक शिक्षक रंजित राठोड, अभिजित भोपळे,प्रशांत भोपळे,अमोल येऊल, श्रीकांत परनाटे,सचिन दही व अजय इंगळे यांना देतात.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button