Uncategorized

मोडकळीस चाललेली कुटुंब व्यवस्था सुस्थितीत आणण्यासाठी पालकांनी कौटुंबिक सुसंवादावर भर द्यावा! ; ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाघ.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

वारी भैरवगड ; संत वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश्वर वारी भैरवगड येथे आयोजित श्री माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिरातील विद्यार्थ्यांच्या पालकांशी सुसंवाद साधत असताना भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ म्हणतात की , आज विज्ञानाच्या बेसुमार प्रगतीमुळे संपूर्ण विश्व आपल्या मुठीत आले आहे . परिणामी कुटुंब प्रमूखाच्या ताब्यात असणारे घर मात्र हाताबाहेर गेले आहे ‌ भ्रमणध्वनीच्या माध्यमातून विश्वाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक व्यक्तीशी पाहिजे त्यावेळी आणि पाहिजे तेवढ्या वेळेपर्यंत संवाद साधण्याची व्यवस्था झाली आहे . किंबहुना आभाशी दृश्य प्रणाली द्वारा प्रत्यक्ष अमोरासमोर बसून केलेल्या चर्चेप्रमाणे सुद्धा प्रत्यक्ष संवादाची व्यवस्था झालेली आहे . आणि प्रत्येक व्यक्ती याचा केवळ योग्य तेवढा नाही तर ; अवाजवी फायदा घेताना दिसून येते आहे . खंत फक्त याच गोष्टीचे आहे की ! परराष्टातिल व्यक्तीशी रोज संवाद साधणारी व्यक्ती एका घरात राहून घरातील व्यक्तीशी मात्र महिना महिना बोलत नाही . त्यामुळे कुटुंब व्यवस्था मोडकळीस आली आहे ‌ तिला सुस्थितीत आणण्यासाठी पालकांनी कौटुंबिक सुसंवादावर भर दिला पाहिजे . असे कळकळीचे आवाहन श्री भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी केले.
ज्ञानेश्वर महाराज भालतीलक यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार ते पुढे म्हणाले की ! भारतीय एकत्र कुटुंब पद्धती ही जगाच्या समोरील आदर्श व्यवस्था होती .परंतु आज स्वातंत्र्याचा केवळ स्वैराचार असाच अर्थ करून करून ती कुटुंब व्यवस्था मोडकळीस आणल्या जात आहे . पूर्वीच्या काळी कुठलीही गोष्ट अडली तर त्या शंकेचे समाधान आजी आजोबांना नामक गुगलच्या माध्यमातून केले जात होते . आज मात्र ” हम दो हमारे दो और दादा दादी निकाल दो ” हा एक अलिखित नियमच जणू काही सद्यस्थितीमध्ये रूढ झालेला दिसतोय . त्यामुळे संस्काराचे केंद्रबिंदू असणारे आणि सुसंवादाचे योग्य स्थळ असणारे आजी-आजोबा हे घरात नाही तर वृद्धाश्रमात जीवन जगतात ही एक भारतीय संस्कृतीच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठी शोकांतिका आहे . याला वेळीच आवर न घातल्यास याचे भयावह परिणाम आपल्याला भोगावे लागतील असे ही ते यावेळी म्हणाले.✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button