मोडकळीस चाललेली कुटुंब व्यवस्था सुस्थितीत आणण्यासाठी पालकांनी कौटुंबिक सुसंवादावर भर द्यावा! ; ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाघ.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी
वारी भैरवगड ; संत वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश्वर वारी भैरवगड येथे आयोजित श्री माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिरातील विद्यार्थ्यांच्या पालकांशी सुसंवाद साधत असताना भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ म्हणतात की , आज विज्ञानाच्या बेसुमार प्रगतीमुळे संपूर्ण विश्व आपल्या मुठीत आले आहे . परिणामी कुटुंब प्रमूखाच्या ताब्यात असणारे घर मात्र हाताबाहेर गेले आहे भ्रमणध्वनीच्या माध्यमातून विश्वाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक व्यक्तीशी पाहिजे त्यावेळी आणि पाहिजे तेवढ्या वेळेपर्यंत संवाद साधण्याची व्यवस्था झाली आहे . किंबहुना आभाशी दृश्य प्रणाली द्वारा प्रत्यक्ष अमोरासमोर बसून केलेल्या चर्चेप्रमाणे सुद्धा प्रत्यक्ष संवादाची व्यवस्था झालेली आहे . आणि प्रत्येक व्यक्ती याचा केवळ योग्य तेवढा नाही तर ; अवाजवी फायदा घेताना दिसून येते आहे . खंत फक्त याच गोष्टीचे आहे की ! परराष्टातिल व्यक्तीशी रोज संवाद साधणारी व्यक्ती एका घरात राहून घरातील व्यक्तीशी मात्र महिना महिना बोलत नाही . त्यामुळे कुटुंब व्यवस्था मोडकळीस आली आहे तिला सुस्थितीत आणण्यासाठी पालकांनी कौटुंबिक सुसंवादावर भर दिला पाहिजे . असे कळकळीचे आवाहन श्री भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी केले.
ज्ञानेश्वर महाराज भालतीलक यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार ते पुढे म्हणाले की ! भारतीय एकत्र कुटुंब पद्धती ही जगाच्या समोरील आदर्श व्यवस्था होती .परंतु आज स्वातंत्र्याचा केवळ स्वैराचार असाच अर्थ करून करून ती कुटुंब व्यवस्था मोडकळीस आणल्या जात आहे . पूर्वीच्या काळी कुठलीही गोष्ट अडली तर त्या शंकेचे समाधान आजी आजोबांना नामक गुगलच्या माध्यमातून केले जात होते . आज मात्र ” हम दो हमारे दो और दादा दादी निकाल दो ” हा एक अलिखित नियमच जणू काही सद्यस्थितीमध्ये रूढ झालेला दिसतोय . त्यामुळे संस्काराचे केंद्रबिंदू असणारे आणि सुसंवादाचे योग्य स्थळ असणारे आजी-आजोबा हे घरात नाही तर वृद्धाश्रमात जीवन जगतात ही एक भारतीय संस्कृतीच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठी शोकांतिका आहे . याला वेळीच आवर न घातल्यास याचे भयावह परिणाम आपल्याला भोगावे लागतील असे ही ते यावेळी म्हणाले.✍️



