आरओ फिल्टर केंद्रात फाटक व तारांची चोरी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
तालुक्यातील कालखेड येथील ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पाणी फिल्टर केद्रांच्या दरवाजाचे कुलुप तोडून आतम ध्ये असलेल्या यंत्राची तोडफोड करुन कंपाऊंडचे लोखंडी गेट व काटेरी तारांचे कुपंन घेऊन अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना ७ मे रोजी उघडकीस आली आहे.
शेगाव तालुक्यातील खारपाण पट्ट्यातील गावांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे या हेतूने शासनाने तालुक्यातील काही गावात आरओ फिल्टरचा संच बसविण्यात आलेला आहे. परंतु दरम्यान वारी धरनातून आलेल्या लिकेजवरच खेड्यातील ग्राम
स्थांची तहान भागत असल्याने आरओ फिल्टरची मशीन बंद आहे. या बंद असलेल्या फिल्टर केंद्राच्या मुख्य दाराचे गेटचे कुलुप टॉमी ने वाकवून अज्ञात चोरट्याने मशीनची तोडफोड करून कंपाऊडचे लोखंडी फाटक व काटेरी तारांचे कुंपन असे ६ हजार रूपयाचे नुकसान करून चोरी केली. याबाबत ग्रा. पं. सरपंच पवन बरिंगे यांनी आज ७ मे रोजी दिलेल्या तक्रारीवरुन शेगाव ग्रामीण पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुध्द कलम ४२७ भादवी अन्वये गुन्हा नोंद केली आहे. पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत



