
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा
(बुलढाणा ): जनतेचा जाहीरनामा कार्यक्रमातून त्यांनी जिल्हा वासियांना विकासाच्या संकल्पना मांडण्याचे आवाहन केले होते.त्यानंतर गेल्या ६ महिन्यांत जिल्ह्यातील तब्बल ७० हजार ७३३ जणांनी संदीप शेळके यांना पत्र लिहून विकासाच्या संकल्पना सांगितल्या. तसेच लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आग्रह केला.
गेल्या वर्षभरापासून संदीप शेळके यांनी वन बुलढाणा मिशन ही राजकीय लोक चळवळ सुरू केली. जिल्ह्याच्या शाश्वत व सर्वांगीण विकासासाठी संदीप शेळके कटिबद्ध आहेत. त्यासाठी त्यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. संदीप शेळके यांनी लोकसभेसाठी अर्ज भरावा ही जिल्ह्यातील जन माणसाची भावना होती. तशी भावना हजारो नागरिकांनी पत्रद्वारे व्यक्त केली आहे.
आपले सामाजिक काम मोठे आहे. जिल्ह्यातील हजारो तरुणांना आपण रोजगार उपलब्ध करून दिला आहे. जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन आपल्याकडे आहे. तुमच्यासारखा माणूस संसदेत पोहोचला तर जिल्ह्याचा कायापालट होईल. त्यामुळे तुम्ही लोकसभा निवडणुकीत उभे राहावे, आमचे तुम्हाला पूर्ण सहकार्य राहील, असाच बहुतांश पत्रांचा आशय आहे.



