Uncategorized

नवरदेव बेपत्ता झाल्याची शेगाव पोलीस स्टेशनला तक्रार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव । दोन दिवसावर लग्न आले असताना नवरदेव बेपत्ता झाल्याची घटना तालुक्यातील चिंचोली येथे उघडकीस आली आहे.

येथील युवक सागर शामराव होनाळे (३०) याचे ४ एप्रिल २०२४ रोजी लग्न ठरलेले आहे. त्याची घरी लग्नाची तयारी सुरू असून काल सागर हा मी दादी कटिंग करून येतो, असे सांगून दुचाकी घेऊन घरून निघून गेला. मात्र परत आलाच

नाही. यामुळे नातेवाईकांनी त्याची सर्वत्र शोधाशोध सुरू केली पण तो मिळून आला नाही. यामुळे याबाबत त्याचे काका विश्वनाथ होनाळे यांनी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून यावर पोलिसांनी हरविल्याची नोंद केली आहे. लग्नाच्या दोन दिवसाआधीच नवरदेव बेपत्ता झाल्याने व या घटनेची परिसरात चांगलीच चर्चा होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button