Uncategorized

गोदावरी अभियांत्रिकीचा शारीक शाह याचे किक बॉक्सिंग मध्ये घवघवीत यश

जळगाव दि १० — गोदावरी अभियांत्रिकीचा शारीक शाह यांने किक बॉक्सिंग स्पर्धेत ३ सुवर्णपदक प्राप्त करत घवघवीत यश प्राप्त केले आहे.
स्पार्टनर्स किक बॉक्सिंग असोसिएशन च्या माध्यमातून डिस्ट्रिक्ट किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२४ स्पोर्ट्स डिपार्टमेंट पी.ओ नाहाटा कॉलेज भुसावल येथे आयोजित करण्यात आली होती. या चॅम्पियनशिपमध्ये गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रथम वर्षाचा शारीक शाह या विद्यार्थ्याने जिल्हास्तरीय पातळीवर यश मिळवले.शारीकने एकूण ३ सुवर्णपदक मिळविले. त्यात १ सुवर्णपदक पॉइंट फाइट मध्ये व १ सुवर्णपदक लाइट कॉन्टॅक्ट मध्ये आणि १ म्युजिकल फॉममध्ये मिळवले. या चॅम्पियनशिप मध्ये ३८ सुवर्णपदक जळगाव जिल्हयाने मिळवले. जळगाव जिल्हयातील ३८ सुवर्णपदकांमधील ३ सुवर्णपदक शारीकने मिळवले. जळगाव या स्पर्धेमध्ये द्वितीय स्थानावर राहिले.शारीकच्या यशाकरिता गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील आणि मा. सदस्य डॉ. केतकी पाटील यांनी मन:पूर्वक अभिनंदन केले. तसेच गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील आणि प्रथम वर्षीय विभागप्रमुख डॉ. नितीन भोळे आणि सर्व शिक्षकवर्गाने शारीकचे अभिनंदन केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button