डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव यांचा शैक्षणिक दौरा.

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव यांचा शैक्षणिक दौरा.
जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव यांचा महात्मा फुले कृषी विद्यापिठ राहूरी येथे शैक्षणिक दौरा नुकताचा संपन्न झाला. याचबरोबर विविध स्थळांना देखिल भेटी देण्यात आल्यात.
गोदावरी अभियांत्रिकी येथून दि. १७ मार्च २०२४ ला शैक्षणिक सहल ची सुरुवात झाली. यावेळी कृषी संकुल परिसराचे संशोधन व संचालक डॉ. अशोक चौधरी, उपकुलसचिव प्रा. अतुल बोंडे,कृषी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रवीण देवरे, परीक्षा विभागाचे विभाग प्रमुख प्रा. शरद पाटील, प्रा. निलेश सदार, शुभेच्छा देण्यासाठी गोदावरी अभियंत्रिकी महाविद्यालय जळगाव येथे उपस्थित होते. पहिल्या दिवशी प्रती काशी शिर्डी पसून ५ज्ञा असणार्या मंदिराचे दर्शन, शिर्डी येथे साईबाबा दर्शन ,महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे शेतकरी निवास येथे मुक्काम.दुसरा दिवशी महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. येथील महत्त्वाच्या विभागाशी भेट आणि प्रात्यक्षिक माहिती घेवून शनिशिंगणापूर येथे दर्शन व महाबळेश्वर येथे मुक्काम,तिस या दिवशी प्रतापगड किल्ला व शिवकालीन खेडेगाव, महाबळेश्वर येथील गहू संशोधन केंद्र आणि लोकल पॉईंट्स चौथा दिवशी शरद चंद्रजी पवार कृषी महाविद्यालय दहिवली, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र,भाटे,गणपतीपुळे येथील गणपतीचे दर्शन पाचवा दिवस डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील सर्व महत्त्वाच्या विभागाशी भेट देऊन प्रात्यक्षिक माहिती घेण्यात आली. शेवटचा दिवशी जेजुरी येथील दर्शन घेवून जळगाव महाविद्यालयातील सर्वच वरिष्ठ प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी प्रा. दर्शना जाधव प्रा. इंगोले सचिन पाटील फाळके काका आणि टूर मॅनेजर राजु भाऊ यांनी परिश्रम घेतले.



