बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

१३ ऑक्टोबर या घोषणा दिनानिमित्त संग्रामपूर तालुक्यातील पिंपरी अडगाव येथे ग्रंथ प्रवचनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,

संग्रामपुर तालुका प्रतिनिधी,

रतन भगत.

संग्रामपूर (पिंपरी अडगाव) दि.१४/१०/२६ सविस्तर वृत्त असे की संग्रामपूर तालुक्यातील पिंपरी ( अडगाव) येथे भारतीय बौद्ध महासभा तसेच वंचित बहुजन आघाडी संग्रामपूर तालुक्याच्या वतीने१३ ऑक्टोंबर या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक जिल्ह्यात जिल्ह्यातील येवला येथे” मी हिंदू म्हणून जन्माला आलो ते माझ्या हातात नव्हते परंतु मी हिंदू म्हणून मरणार नाही “अशा प्रकारची घोषणा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली होती. या घोषणा दिनाचे औचित्य साधून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रवचन मालिकेला संग्रामपूर तालुक्यातील पिंपरी अडगाव येथील बौद्ध उपासक उपाशी का बौद्ध बांधव महिला मंडळ यांचा प्रवचन मालिकेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संस्कार सचिव बुद्धाचार्य मिलिंद वानखडे साहेब आणि भारतीय बौद्ध महासभेचे प्रभारी संग्रामपुर तालुका अध्यक्ष आयुष्यमान भाऊरावजी गवांदे साहेब यांच्या हस्ते पुष्पहार व फुले अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी ग्रंथवाचक कांचन संतोष गायकवाड यांनी केले तर प्रास्ताविक पर भाषण रतन भगत यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संस्कार सचिव आयुष्यमान बौद्धाचार्य मिलिंद वानखडे साहेब तसेच भारतीय बौद्ध महासभेचे प्रभारी संग्रामपूर तालुका अध्यक्ष भाऊरावजी गवांदे साहेब, रतन भगत, अशोक वानखडे, वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ते, संतोष गायगोड, पिंपरी अडगाव येथील पोलीस पाटील गायगोड साहेब , बौद्ध पंच महिला मंडळ ,उपासक, उपासिका व लहान बालक, बालिका फार मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते. भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संस्कार सचिव आयुष्यमान बौद्धाचार्य मिलिंद वानखडे साहेब आणि भाऊराव गवांदे साहेब प्रभारी संग्रामपूर तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांनी 13 ऑक्टोबर या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणा दिनानिमित्त उपस्थित जन्मसमूहाला योग्य अशा प्रकारचे फार मोलाचे मार्गदर्शन केले सदर प्रवचनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button