अकोलामहाराष्ट्रविदर्भ

हिवरखेड नगरपरिषदेच्या नवीन इमारतीसाठी वाण वसाहतीची जागा मंजूर

आमदार प्रकाशभाऊ भारसाकळे यांनी केली वचनपूर्ती

हिवरखेड (वार्ताहर )
हिवरखेड नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला असून अकोट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रकाशभाऊ भारसाकळे यांचा खंबीर पाठपुरावा आणि सततच्या प्रयत्नांमुळे हे यश मिळाले असून आता काही महिन्यातच हिवरखेड नगर परिषदेचे बांधकाम होऊन कामकाज नवीन इमारतीमध्ये चालणार आहे. सदर इमारत हिवरखेड सोनाळा रोडवर जुन्या वाण वसाहत प्रकल्पाच्या जागेवर होणार असून त्याचे क्षेत्रफळ 6400 चौरस मीटर इतके आहे. सदर जागा हिवरखेड नगर परिषदेला हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावास शासनाकडून प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. हिवरखेड नगरपरिषद स्थापनेपासूनच शहराच्या विकासाला गती देण्यासाठी आणि नागरिकांना अद्यावत सेवा सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र व सुसज्ज प्रशासकीय इमारतीची अत्यंत गरज होती ही गरज ओळखून आमदार प्रकाशभाऊ भारसाकळे यांनी वाण वसाहत प्रकल्पाची मोकळी जागा हिवरखेड नगरपरिषदेच्या इमारतीसाठी मिळावी यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आल्याने हिवरखेड शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या नवीन इमारतीचा मार्ग मोकळा झाला आहे.हिवरखेड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी आमदार प्रकाशभाऊ भारसाकळे यांनी हिवरखेडला भाजपची सत्ता आल्यास सुसज्ज नगरपरिषद इमारत बांधून देण्याचे वचन दिले त्याची पूर्तता आमदार प्रकाशभाऊ भारसाकळे यांनी केली असून शासनाच्या या निर्णयामुळे हिवरखेड शहरातील नागरिकांमध्ये आणि प्रशासकीय वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.नवीन जागेमुळे नगरपरिषदेचे कामकाज अधिक नियोजनबद्ध आणि गतीने होण्यास मदत होणार हे निश्चित.

आमदार प्रकाशभाऊ भारसाकळे यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे आणि दूरदृष्टीमुळेच शहराचा हा अत्यंत महत्त्वाचा असलेला प्रश्न सुटला असून सदर जागा मिळाल्यामुळे लवकरच हिवरखेडकरांच्या सेवेत एक भव्य आणि अत्याधुनिक नगर परिषद इमारत उभी राहील. आमदार प्रकाशभाऊ भारसाकळे व महाराष्ट्र शासनाचे हिवरखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सुलभा रमेश दुतोंडे, मुख्याधिकारी सतीशजी गावंडे उपाध्यक्ष प्रतिभा वीरेंद्र येऊल व सर्व सभापती तथा नगरसेवक नगरसेविका यांच्यावतीने आभार मानण्यात आले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button