गटविकास अधिकारी माधव पायघन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाची शिष्टाई; अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्यांनी सोडले उपोषण….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
पातुर्डा:- ७ ऑक्टोबर २०२६
पंचायत समिती संग्रामपूर अंतर्गत जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा, पातुर्डा या शाळेच्या वॉल कंपाउंडच्या कामासंदर्भात विविध मागण्यांसाठी दि. ६ ऑक्टोबर २०२६ पासून पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाची आज सकारात्मक चर्चेतून सांगता झाली. पातुर्डा येथील शाळेच्या वॉल कंपाउंडचे बांधकाम सुरू करण्यात यावे, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, या मागणीसाठी तालुका अध्यक्ष, अल्पसंख्याक स्वराज्य पक्ष श्री. दाऊद शाह, श्री. शेख शकील, श्री. बरकत शाह व इतर ग्रामस्थ पातुर्डा बु. यांनी उपोषण सुरू केले होते.
या संदर्भात पंचायत समिती संग्रामपूरकडे निवेदन साद करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विषय गांभीर्याने घेत प्रशासनाने उपोषणकर्त्यांशी सकारात्मक चर्चा करून तोडगा काढण्याची भूमिका घेतली.
आज दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी मा. श्री. माधव पायघन, गटविकास अधिकारी, पंचायत समिती संग्रामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषणकर्त्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी श्री. प्रशांत डिक्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत मा. श्री. सारंग कुलकर्णी, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती संग्रामपूर; श्री. मारोडे, ग्रामविकास अधिकारी; श्री. सचिन वडाळ, शिक्षण विस्तार अधिकारी; श्री. कुलदीप बुंदे, केंद्रप्रमुख, श्री. अब्दुल्ला खान केंद्रप्रमुख तसेच संबंधित ग्रामस्थ व उपोषणकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रशासनाच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. निधी उपलब्ध झाल्यानंतर उपलब्ध निधीनुसार आर.सी.सी. पक्के बांधकाम असलेले वॉल कंपाउंड करण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक तातडीच्या उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या सकारात्मक आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी प्रशासनावर विश्वास व्यक्त करत दि. ६ ऑक्टोबरपासून सुरू असलेले उपोषण मागे घेतले. त्यामुळे प्रशासन व ग्रामस्थ यांच्यातील सकारात्मक संवादातून या प्रश्नावर तोडगा निघाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. उपोषणकर्ते….
श्री. दाऊद शाह – तालुका अध्यक्ष, अल्पसंख्याक स्वराज्य पक्ष
श्री. शेख शकील श्री. बरकत शाह
तसेच पातुर्डी येथील इतर ग्रामस्थ
प्रशासनाच्या वतीने उपस्थित
मा. श्री. माधव पायघन – गटविकास अधिकारी, पंचायत समिती संग्रामपूर श्री. प्रशांत डिक्कर – प्रमुख उपस्थिती
मा. श्री. सारंग कुलकर्णी – गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती संग्रामपूर श्री. मारोडे – ग्रामविकास अधिकारी
श्री. सचिन वडाळ – शिक्षण विस्तार अधिकारी श्री. कुलदीप बुंदे – केंद्रप्रमुख श्री. अब्दुल्ला खान – केंद्रप्रमुख विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळेच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न प्रशासनाने सकारात्मकतेने हाताळल्याने पातुर्डा बु. ग्रामस्थांच्या मागणीला योग्य प्रतिसाद मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली……✍️



