महाराष्ट्र

शेगावमध्ये ‘नो पार्किंगझोन’बाबत आदेश

शेगावमध्ये ‘नो पार्किंगझोन’बाबत आदेश

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे) श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी दररोज येणाऱ्या हजारो भाविकांमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते श्री गजानन महाराज मंदिर उत्तरेकडील प्रवेशद्वारापर्यंत गर्दी असते. त्यामुळे या रस्त्यावर वाहने उभी करू नयेत, तसेच मार्ग २४ तास रहदारीस मोकळा ठेवावा. हा परिसर ‘नो पार्किंग झोन जाहीर करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आदेश बजावले असून, वाहनधारकांनी नोंद घ्यावी, असे ठाणेदार अनिल गोपाळ यांनी केले आहे.मुंबई उम्र न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात २००७ मध्ये आनंदीलाल हजारीमल भुतठा विरुध्द महाराष्ट्र शासन आणि इतरांद्वारे याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामध्ये उम्र न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार शेगंय तिर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत श्री गजानन महाराज मंदिर से डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हा रस्ता ‘नो पार्किंग झोन’ म्हणून जाहीर करण्याची अधिसूचना काढण्याबाबत तसेच श्री गजानन महाराज मंदिर परिसरात उत्तरेकडील प्रवेशद्वारासमोरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील भक्त निवास प्रवेशद्वारापर्यंत तसेच ढोलपुरी प्रवेशद्वाराजवळील योगीराज गेस्ट हाऊसपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील तथागत बौध्द विहारापर्यंत दोन्ही याजूकडील रस्ता २४ तास सर्व दिवस ‘नो पार्किंग झोन म्हणून जाहीर करण्याबाबत न्यायालयाने निर्देश दिले होते. त्यानुसार त्यामुळे जिल्हादंडाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी ‘नो पार्किंग झोन बायत १० मार्च रोजी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार संबंधित ठिकाणी सर्व दिवस २४ तास सर्व प्रकारच्या वाहनांसाठी ‘नो पार्किंग झोन जाहीर करण्यात आला आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button