बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

हजरत मोहम्मद पैगंबर यांच्यावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाचे निवेदन; कठोर कारवाईची मागणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी ; शंकर शिवरकर

देऊळगाव राजा : सोशल मीडियावर नाझिया इलाही खान यांनी हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह व निंदनीय वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ 3 जुलै शुक्रवार रोजी स्थानिक पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांना लेखी निवेदन देण्यात आले मोठ्या संख्येने मुस्लिम समाजबांधव स्थानिक पोलीस ठाण्यात एकत्र आले. संबंधित महिलेविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत त्यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन सादर केले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, हजरत मोहम्मद पैगंबर हे केवळ मुस्लिम समाजाचेच नव्हे, तर संपूर्ण मानवजातीसाठी आदर्श व पूजनीय व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्याबाबत करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना तीव्रपणे दुखावल्या असून अशा प्रकारची विधाने सामाजिक सलोखा बिघडविणारी व शांततेस बाधा आणणारी असल्याचे समाजबांधवांनी म्हटले आहे.

प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित महिलेविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी तसेच भविष्यात कोणत्याही धर्माच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या कृत्यांवर कठोर प्रतिबंध घालण्यात यावा, अशी मागणी मुस्लिम समाजाने प्रशासनाकडे केली.

यावेळी चिखली रोडवरील श्री भगवान बाबा चौक येथून मुस्लिम समाजाच्या वतीने शांततापूर्ण मूक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन निषेध व्यक्त करत निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी अशपाक शहा, अनावर खान (नगरसेवक), शेख गौस, जाहीर खान, मोहसीन शेख, वसीम शहा, रवी पिंपळे, नासेर शहा, शेख सलमान, शेख अलीम, आमीर खान, शोहेब शहा, आयन अली, अब्दुल शाह, राजिक शहा, अरबाज मिर्झा यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते. निवेदनावर अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्याही घेण्यात आल्या.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button