बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाच्या वतीने ‘खाऊ गल्ली’ची मागणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी; शंकर शिवरकर

मुख्याधिकारी अरुण मोकळा यांना ३ जुलै रोजी लेखी निवेदन सादर
देऊळगाव राजा, प्रतिनिधी : शहरातील बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच शहरातील वाहतूक कोंडी व फुटपाथवरील अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी देऊळगाव राजा नगरपालिकेच्या उपलब्ध जागेवर नियोजनबद्ध ‘खाऊ गल्ली (फूड स्ट्रीट)’ उभारण्यात यावी, अशी मागणी मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात ३ जुलै रोजी नगरपालिका परिषद, देऊळगाव राजा येथील मुख्याधिकारी अरुण मोकळा यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, देऊळगाव राजा शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता अनेक बेरोजगार युवक व लघु व्यावसायिक शहरातील विविध रस्ते, चौक व फुटपाथवर तात्पुरते खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र अशा अनधिकृत स्टॉलमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो, तसेच फुटपाथवर अतिक्रमण होऊन नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
नगरपालिकेने उपलब्ध जागेचा सर्वेक्षण करून नियोजनबद्ध पद्धतीने ‘खाऊ गल्ली’ विकसित केल्यास बेरोजगार युवकांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होईल. सर्व खाद्यपदार्थ विक्रेते एकाच ठिकाणी व्यवसाय करू शकतील, शहरातील वाहतूक सुरळीत राहील, अतिक्रमण कमी होईल तसेच शहर अधिक स्वच्छ, सुंदर व आकर्षक बनेल. याशिवाय नागरिकांसह शहरात येणाऱ्या पर्यटकांनाही विविध दर्जेदार खाद्यपदार्थ एकाच ठिकाणी उपलब्ध होतील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या वेळी मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ओमप्रकाश पराड यांच्यासह सुषमा राऊत, प्रशांत पंडित, प्रकाश साकला, बाबासाहेब साळवे, रणजीत खिल्लारे, पंढरीनाथ गीते, जुनेद कुरेशी, अंबादास बुरुकुल, रवी जाधव, गणेश मुंडे, भीमराव चाटे, दयासिंग बावरे, किशोर जमादार, गुलाम, शिवाजी वायाळ, शंकर शिवरकर, राजेश पंडित तसेच संघाचे इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. सर्वांच्या स्वाक्षरीसह हे निवेदन मुख्याधिकारी अरुण मोकळ यांच्याकडे सादर करण्यात आले.
मातृतीरमातृतीर्थ तालुका पत्रकार संघाच्या वतीने ‘खाऊ गल्ली’ची मागणी

मातृतीरतालुका पत्रकार संघाच्या या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर ‘खाऊ गल्ली (फूड स्ट्रीट)’ उभारण्याचा निर्णय घ्यावा व पात्र बेरोजगार युवकांना नियमानुसार जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे. मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाच्या या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर ‘खाऊ गल्ली (फूड स्ट्रीट)’ उभारण्याचा निर्णय घ्यावा व पात्र बेरोजगार युवकांना नियमानुसार जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button