बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

देऊळगाव राजा बसस्थानकावर महिलेच्या गळ्यातील सोन्याचे डोरले लंपास; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी ;- शंकर शिवरकर

देऊळगाव राजा, दि. ३ जुलै : देऊळगाव राजा बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या गळ्यातील काळ्या मण्यांच्या पोतातील सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. रुख्मिणी योगेश तौर (वय 34, रा. सिंदखेड राजा) या आपल्या पतीसमवेत संभाजीनगर–अकोला जाणाऱ्या बसमध्ये चढत होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात इसमाने त्यांच्या गळ्यातील काळ्या मण्यांचे पोत तोडून त्यामधील सुमारे 3 ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे डोरले व दोन मणी, अंदाजे 30 हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले.
या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कायमी गुन्हा क्रमांक 303/2026 अन्वये कलम 303(2) भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस हेडकॉन्स्टेबल माधव कुटे यांनी गुन्हा नोंदविला असून, पोलीस हेडकॉन्स्टेबल भास्कर सानप पुढील तपास करीत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button