कवयित्री बहिणाबाई विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या एलएलबी च्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ:-(तालुका प्रतिनिधी प्रमोद सौंदळे)

सविस्तर वृत्त असे की एलएलबी च्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ!
पेपर लिहिलेले असतानाही ऑनलाइन तपासणीमुळे गुण कमी दिले जात आहेत. तसेच पेपर देऊनही निकालामध्ये गैरहजर दाखवण्यात येत आहे.कवियत्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या एलएलबी परीक्षांच्या पेपर तपासणीत अजब कारभार झाल्याने,विद्यार्थी आणि पालक वर्ग मधून आरोप केले जात आहे. या अजब कारभाराने वारंवार तक्रार करूनही विद्यापीठ प्रशासन कानाडोळा करून आयुष्याशी खेळ करत आहे.
आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर विद्यार्थी आलेले असताना आणि आपले उज्वल भविष्य घडविण्यासाठी पेपर प्रत्यक्ष लिहिले असतानाही, तपासणी ऑनलाईन का??
विद्यापीठाने नुकत्याच घेतलेल्या एल एल बी तीन वर्ष प्रथम सत्रांच्या परीक्षांचा निकाल नुकताच लागला. यामध्ये विद्यार्थ्यांनी पेपर लिहूनही त्यांना कमी मार्क मिळाले आहेत. पेपर प्रत्यक्ष कागदावर लिहिलेला असताना तपासणी मात्र ऑनलाईन होत असल्याने यामध्ये त्रुटी आढळून आलेले आहेत. याचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून,पास असतानाही ऑनलाइन तपासणीत कमी मार्क देत असल्याने नापास चा ठपका ओढवून घ्यावा लागत आहे.
त्यामुळे पेपर प्रत्यक्ष लिहिलेले असतानाही ऑनलाईन तपासणीच्या अट्टहासाने तपासणी करताना, कोणत्या विश्वात राहून तपासणी होते?? असा प्रश्न पडला आहे. प्रत्यक्ष कागदावर पेपर दिलेले असताना,
पेपर देऊनही गैरहजर दाखवण्यात आलेले आहे.
विद्यार्थ्यांनी विद्यापीठाणे दिलेल्या तारखेला दिलेल्या वेळेत दिलेल्या महाविद्यालयात जाऊन प्रत्यक्ष पेपर लिहूनही, तसेच विद्यापीठाच्या परीक्षांच्या कागदांवर हजर आहेत. मात्र परीक्षेच्या निकालात गैरहजर आल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
हे पेपर लिहूनही तीन ते चार विषयात नापास करीत आहेत. पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील बोटावर मोजणे इतकी असते . पुनश्च पेपर देणे हे विद्यार्थ्यांना देखील परवडणारे नाही.
पुनर्तपासनी आणि पेपर कॉपी विद्यार्थ्यांना परवडत नाही !
निकाल लागल्यानंतर मार्कांवर हरकत घेण्यासाठी विद्यार्थी फोटोकॉपी मागवतात. त्यानंतर पुन्हा तपासण्याचा अर्ज करतात. फोटोकॉपी फी प्रत्येकी 250 रुपये आहे, तर तपासणी फी 110, व फोटोकॉपी परत चेक करण्यासाठी 500 खर्च आणि होणारा मानसिक त्रास, त्यानंतर पुनश्च पेपर देण्याची फी, लागणारा वेळ बघता हे सर्व परवडणारे नाही.विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराच्या तक्रारी येत असूनही कुंभकर्णी झोपी गेलेले प्रशासनाला जाग येत नाही. त्यामुळे उज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्यासाठी काबाड कष्ट करून घाम गाळून शिकविणाऱ्या पालकांच्या स्वप्नांना तीलांजनी देण्याचे काम जळगाव विद्यापीठाकडून होताना दिसत आहे. एल एल बी च्या विद्यार्थ्यांनी ह्या निकाला च्या विरुद्ध परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा योगेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.



