Uncategorized

जागृत देवस्थान श्री कालिंका देवी मंदीर वामन नगर येथे वर्धापन दिन व वसंत पंचमी उत्सव हर्षोल्हासात साजरादेवीच्या स्वागता साठी वामन नगर, समता,१,२,३ परिसर सडा व रांगोळ्यांनी सजला.भाविकांनी आवाळून व फटाके फोडून केले पालखीचे स्वागत

स्टार भारत लाइव बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतीनीधी ऋषिकेश देठे

जागृत देवस्थान श्री कालिंका देवी मंदीर वामन नगर खामगांव येथे दरवर्षी प्रमाणे वसंत पंचमीला वर्धापन दिनी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. या वर्षी देखील श्री कालिंकादेवी कासार समाज मंडळ खामगांवच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करुन हा उत्सव साजरा करण्यात आला.
जागृत देवस्थान श्री कालिंकादेवी मंदीर वामन नगर खामगांव येथे ‍रविवार दि. ०२ फेब्रुवारी सकाळी ८.०० वा अभिषेक करण्यात आला. यानंतर भजन व गायन करुन आई कालिंका मातेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यानंतर दुपारी ४.०० वा आई कालिंकेची शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभा यात्रेत महिला व पुरुष मंडळींनी पारंपारीक वेशभुषा परिधान केली होती.
देवस्थान परिसरातील वामन नगर समता कॉलनी भागात दारोदारी सडा टाकण्यात आला. महिला भगिनींनी रांगोळ्या काढून संपुर्ण परिसर सुशोभित केला होता. गायनाचार्य, मृदुंगाचार्य व टाळकरी यांनी विविध भजने म्हणून व पाऊली खेळून परिसर संपुर्ण परिसर भक्ती भावाने उत्साहीत झाला होता.
मागील जवळपास ४० वर्षापासून श्री कालिंकादेवी मंदीर हे एक जागृक देवस्थान म्हणून प्रसिध्द आहे. राज्यातील विविध भागातून भाविक दर वर्षी वर्षातून एकदा तरी या देवस्थानाला भेट देतात. यामुळे दरवर्षी भाविकांचा वाढता ओघ या मंदीरात सुरु असतो. दर वर्षी हजारो भाविक या जागृत देवस्थानाला भेट देतात.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी श्री कालिंकादेवी कासार समाज मंडळ व कासार समाज महिला मंडळानी अथक परिश्रम घेतले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button