सी.एम.व्ही.रोगामुळे नुकसानग्रस्त जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी लवकरच सीएससी केंद्रावर केवायसी करून व्हीआर कोड जनरेट करावा, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे…
कुकुंबर मोझॅक व्हायरस (सी.एम.व्ही.) रोगामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे बाबत आज खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव येथे उपजिल्हाधिकारी श्री.गजेंद्र पाटोळे यांची भेट घेऊन चर्चा केली.
यावेळी कुकुंबर मोझॅक व्हायरस (सी.एम.व्ही.) रोगामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळणार असून, पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांनी जवळच्या सीएससी केंद्रावर आपली केवायसी करून व्हीआर कोड जनरेट करावा, आणि अश्या केव्हासी व व्हीआर कोड मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या कृषी विभागामार्फत मागविण्यात येत असून, त्यांना लवकरच नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी श्री.गजेंद्र पाटोळे यांनी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांना दिली.
यावेळी सदर केळी उत्पादक शेतकऱ्यांनी तत्काळ आपल्या जवळच्या सीएससी केंद्रावर भेट देऊन आपली माहिती अद्यायवत करणे बाबत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी शेतकऱ्यांना आव्हाहन केले आहे.




