बुलढाणामहाराष्ट्रमुबईराजकीयविदर्भ

न्यायव्यवस्थेवर मोदींसरकारचा दबाव, लोकशाहीला कलंक लावण्याचा प्रयत्न.

न्यायव्यवस्थेवर मोदींसरकारचा दबाव, लोकशाहीला कलंक लावण्याचा प्रयत्न.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहूरकर

राहुल गांधी यांची शिक्षेवरील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी रद्दच राहणार आहे. याविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. याचबरोबर पटोले यांनी मोदींवर गंभीर आरोप केले आहेत.याचिका फेटाळली असेल तर असुद्या, न्यायव्यवस्थेवर मोदींसरकारचा दबाव आहे, तो यातुन सिद्ध झालेला आहे. यामुळे आम्ही मोदीसरकारच्या विरोधात आंदोलन करू. न्याय व्यवस्थेला आणि सरकारला सांगू की या देशामध्ये सगळ्यांना कायदा समान आहे. मोदी सरकारच्या दबावाखाली येऊन न्याय व्यवस्था अशा पद्धतीच्या कारवाया करत असेल तर काँग्रेस पक्ष लोकशाही पद्धतीने आंदोलन करेल, असा इशारा पटोले यांनी दिला. राहुल गांधी चोर असतील तर त्यांनी ते सिद्ध करावे. ललित मोदी हे देशातील पैसे घेवून पळाले आहेत, त्यांना पकडून का आणत नाही, मोदींचे त्याच्यावर एवढे काय प्रेम आहे. ललित मोदीवर नरेंद्र मोदी चुप का बसतात? का बोलत का नाहीत.असा सवाल पटोले यांनी केला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button