बुलढाणा

वाकी बु. जिल्हा परिषद शाळा केली बोलकी! अवघ्या तीन महिन्यातच निसर्गरम्य वातावरणात विद्यार्थी गिरवतात ज्ञानाचे धडे

. स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी गजानन खिल्लारे.

मागील काळात जिल्हा परिषद शाळा मध्ये आलेली मरगळ झटकण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून विविध उपक्रम राबवून जिल्हा परिषदेच्या शाळांची शिक्षण प्रणाली दर्जेदार व गुणवत्तात्मक झाली पाहिजे हा मुख्य उद्देश समोर ठेवून महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्या माध्यमातून (मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा) अभियान राबविले जात आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाचा 2025 2026 हा तिसरा टप्पा असून देऊळगाव राजा गट शिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील असंख्य शाळा या अभियानात सहभागी झाल्या आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या स्पर्धेत येण्यासाठी बऱ्याच शाळा कामाला लागल्या आहेत. अशातच अवघ्या तीन महिन्यातच वाकी बुद्रुक येथील महिला मुख्याध्यापिका ढवळेगायकवाड यांच्यासह सहकारी शिक्षकांनी अगदी कमी दिवसात मेहनत घेऊन जिल्हा परिषद मराठी शाळा ही बोलकी केली आहे. नुकत्याच तीन महिन्यापूर्वी शिक्षण विभागाच्या ऑनलाइन बदल्या करण्यात आल्या होत्या. अनेकांना आपल्या जुन्या शाळा सोडून नवीन शाळेवर रुजू व्हावे लागले. शाळेवर रुजू होताच. नवीन उत्साह घेऊन. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वाकी बु. या शाळेला सहभागी होण्यासाठी एक मोठे आव्हान होते. परंतु ज्ञान दानाचे पवित्र कार्य करणाऱ्या मुख्याध्यापिका व शिक्षकांनी अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करून या शाळेचा काय अपलोड केला आहे. विद्यार्थ्यांना इलर्निंग च्या माध्यमातून शिक्षण, सेमी इंग्लिश, नव्याने रंगरंगोटी, शाळेच्या भिंतीवर बोलके चित्र, वाचनासाठी बोलके फळे, ज्ञान रचनावादी, स्वातंत्र वाचनालय, स्वतंत्र पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मध्यम भोजन खिचडी खाण्यासाठी बैठक व्यवस्था, स्वतंत्र वर्गखोली व वर्गात लाईट फॅनची व्यवस्था, शाळेच्या सुरुवातीलाच परिपाठ, संविधान वाचन, पसायदान, देशभक्तीपर गीते, सर्व महापुरुषांच्या जयंती साजरी करणे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, सोबतच मुलामुलींना स्वतंत्र स्वच्छालय, दररोजचा घाणकचरा स्वतंत्र खड्ड्यात टाकला जातोय, यासह अनेक उपक्रम या शाळेत राबविले जातात. उत्कृष्ट अशी परसबाग निर्माण करून पाले_भाज्या, कांदे, लसुन, टमाटर, मुळे, शेगडी यासह सुगंधी फुलाचे वृक्षरोपण करण्यात आले आहे. शाळा व्यवस्थापन समितीचा पुढाकार हा शाळेच्या शैक्षणिक प्रगती महत्वपूर्ण ठरत आहे. शाळेला गटविकास अधिकारी मुकेश मोहोर व शिक्षण विस्तार अधिकारी बबन कुमठे यांनी भेट दिली. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचा तिसरा टप्पा सुरू असून या अभियानास सहभागी झालेल्या शाळांची प्रत्यक्ष पाहणी व पडताळणी सुरू आहे. जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा वाकी बु. या शाळाने सहभाग नोंदविला असल्याने देऊळगाव राजा गट विकास अधिकारी मुकेश मोहोर व शिक्षण विस्तार अधिकारी बबन कुंटे यांनी शहायला भेट देऊन मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या निकषावरून शाळेची गुणवत्ता व पडताळणी केली. विद्यार्थ्यांनी मिळत असलेल्या सोयी सुविधा उपलब्ध पाहून शाळेच्या विकासाबद्दल व परत बागेबद्दल समाधान व्यक्त करत. विद्यार्थ्यासोबत हितगुंज साधला. यावेळी सरपंच पवनेर भोसले, शाळा समिती अध्यक्ष शंकर चेके, मुख्याध्यापिका विद्या ढवळे, शिक्षक नामदेव मुरकुट, गणेश वाघ, शंकर राठोड, गजानन चेके व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button