स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसतालुका प्रतिनिधीप्रकाश दांडगे (जळगाव जामोद)

(जळगाव जामोद): सध्या जगभरात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. 26 एप्रिल रोजी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमेवर चेक पोस्ट तैनात आहे. या सगळ्या लगबगीत काल आठ एप्रिल रोजी जळगाव जामोद येथून एका जणांकडून एक पिस्तूल, 17 जिवंत काढतोस जप्त करण्यात आली आहे. काल स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, जळगाव जामोद येथे खरेदी-विक्रीच्या उद्देशाने एक जण पिस्तूल बाळगून होता. शेख जमीन शेख चांद असे या आरोपीचे नाव आहे. तो जळगाव जामोद तालुक्यातील खेडे शिवार भागातील रहिवासी आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी पथक गठीत केले. यशस्वी पोलिसांनी नियोजनातून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यांनी अंगछडी घेतली असता त्याच्याजवळून पिस्तूल, 17 जिवंत काढतुस , दोन मॅक्झिन आणि मोबाईल फोन मिळाला. पोलिसांनी एकूण 77 हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी शेत जमीन शेख चांद याला अटक करण्यात आली.



