एक्सप्रेस रावेर प्रतिनिधी विकास आमोदकर विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेऊन आपले भविष्य उज्वल करावे

एक्सप्रेस रावेर प्रतिनिधी विकास आमोदकर विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेऊन आपले भविष्य उज्वल करावे – प्राचार्य डॉ. अनिल पाटील
रावेरः रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री. विठ्ठलराव शंकरराव नाईक कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात, आय. क्यू. ए. सी. आणि भूगोल विभागाच्या संयुक्त विद्यमाने २२ जुलै २०२५ रोजी ” एन. ई. पी. – 2020” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव यांनी लागू केलेल्या एन. ई. पी. 2020 बद्दल तज्ञ प्राध्यापकांनी महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. यात प्रथम सत्रात प्रा. सी. पी. गाढे, भूगोल विभागप्रमुख यांनी ‘ एन. ई. पी. 2020 आणि विद्यार्थी’ या विषयावर मार्गदर्शन केले, त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनात प्रथम वर्षाच्या कला, वाणिज्य व विज्ञान या विद्यार्थ्यांना कोणकोणत्या अडचणी आहेत, आणि त्या कशाप्रकारे सोडवता येतील, कोणकोणते विषय एम वन, एम टू आणि एम थ्री घेता येतात, मेजर विषय आणि मायनर याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनातील शंका दूर केल्या. ओई, व्हिईसी, सीसी, परीक्षा पद्धत इत्यादी बद्दल सखोल असे मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी “एन. ई. पी. 2020 मध्ये विद्यार्थ्यांना विविध संधी” या विषयावर परिपुर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात एन. ई. पी. 2020 मध्ये विद्यार्थी कसा आपला विविध प्रकारे विकास करून घेऊ शकतो. विद्यार्थ्यांनी एन. एस. एस., योगा, स्पोर्ट्सच्या माध्यमातून विविध कलागुणांचा विकास करून आपले भविष्य उज्वल करण्यासाठी कसा उपयोग करू शकतो याबद्दल विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.
सदर कार्यशाळेचे अध्यक्षपद प्रा. एस. यू. पाटील यांनी भूषवले, या कार्यशाळेचे समन्वयक डॉ. बी. जी. मुख्यदल (आय क्यू ए सी कोऑर्डिनेटर) यांनी सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. डॉ. एस. डी. धापसे यांनी आभार प्रदर्शन केले, या कार्यशाळेला महाविद्यालयातील डॉ. एस. जी. चिचोरे, प्रा. व्हि. डी. पाटील, डॉ. एन. बी. जाधव, प्रा. एस. बी. धनले, प्रा. लालसिंग वळवी, प्रा. सागर महाजन, प्रा. तेजस दसनुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कला, वाणिज्य व विज्ञानचे सर्व प्रथम वर्षाचे विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी सदर कार्यशाळेचा लाभ घेतला. महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी यांनी ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.



