संत सेनाजी महाराज यांचा ६५५ वा पुण्यतिथी सोहळा तेल्हारा येथे विविध उपकार्यक्रमांनी साजरा!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी अकोला जिल्हा
तेल्हारा | तेल्हारा येथे नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री.संत सेनाजी महाराज यांचा ६५५ वा पुण्यतिथी सोहळा तेल्हारा शहरात धार्मिक तसेच सामाजिक उपकार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. श्री. संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीचे अवचित्त साधून बुधवार दि.१९ ऑगस्ट २०२५ रोजी कळस स्थापनेचा कार्यक्रम विधिवत संपन्न झाला याप्रसंगी भजनाचे आयोजन सुद्धा समाज बांधवांकडून करण्यात आले .तसेच गुरुवार दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी बाल कीर्तनकार ह.भ.प कृष्णा महाराज सदाफळे यांच्या धार्मिक कीर्तनाने कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. ह.भ.प कृष्णा महाराज सदाफळे यांनी त्यांच्या मुख वाणीतून संत सेना महाराज यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकत अनेक अध्यात्मिक प्रसंग यावेळी सांगितले. या पुण्यतिथीनिमित्त श्री अग्रसेन महाराज टॉवर चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांना समाज बांधवांकडून दुधाभिषेक करून सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय व संत सेना महाराज यांचा जयघोष केला. दुपारी १२:३० ला महाआरती करण्यात आली , त्या नंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन तसेच शासकीय सेवेत नियुक्त झालेले समाज बांधव ,यांच्या आई-वडीलांचा गौरव बाल कीर्तनकार कृष्णा महाराज सदाफळे यांच्या हस्ते याप्रसंगी करण्यात आला. यानंतर समाजातील उपस्थित नागरिकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. मंचावरील कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने करण्यास आली, सूत्रसंचालन प्रदीप राजुसकर अध्यक्ष नाभिक समाज यांनी केले तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष गोपी तूनवाल यांनी केले . कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली .
याप्रसंगी नितिन सिद्धमुखे, गजानन कान्हेरकर, विलास बेलाडकर, गजानन माझोडकर, मंगेश शिंगणारे, पंकज लोळे, सागर जऊळकर, दिनेश वायकर, विजय राजुसकर, श्याम अठराळे, संदीप रुद्रकार, छोटू रुद्रकार , गजानन राजुसकर,
अभिजीत वायकर, चेतन पिंपळकर , अक्षय रुद्रकार, योगेश लोळे, गौरव लोळे, श्याम लोळे, महेश अमोदकर, संतोष तायडे , विठ्ठल मोतळकार, रोशन कुकडकर, नितीन पिंपळकार, कैलास वायकर, शिवा रुद्रकार, हरिष लीलडे, करण तूनवाल, ओम जऊळकर, विठ्ठल रुद्रकार यांचे सह शहरातील तसेच तेल्हारा तालुक्यातून आलेले समाजातील अनेक नागरिक उपस्थित होते.



