महाराष्ट्र

तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार येथे हजरत टिपू सुलतान यांची जयंती उत्साहात साजरी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा तालुका प्रतिनिधी विजय घोडे.

माळेगाव (बा.)दि.२०:
टायगर ग्रुपच्या वतीने माळेगाव (बा.)ता. तेल्हारा येथील कार्यकर्त्यांनी गावात स्वच्छता अभियान राखून मोठ्या उत्साहात हजरत टिपू सुलतान यांची जयंती साजरी केली. तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार येथील आठवडी बाजारामध्ये मुस्लिम बांधवांनी सोमवार दि.२० नोव्हेंबर २०२३ रोजी हजरत टिपू सुलतान यांची जयंती उत्साहात साजरी केली. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा माळेगावतील टायगर ग्रुप च्या कार्यकर्त्यांनी गावामध्ये पाण्याचे टँकर फिरवले व रोडवर पाणी टाकत स्वच्छता अभियान राखून मोठ्या उत्साहात हजरत टिपू सुलतान यांची जयंती साजरी केली.सर्व प्रथम हजरत टिपू सुलतान यांच्या प्रतिमेचा दुधा अभिषेक करण्यात आला व प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. तसेच उपस्थित असलेल्या मान्यवरांनी हजरत टिपू सुलतान यांच्या जीवनावर प्रकाश टाकत मुस्लिम बांधवांना मार्गदर्शन केले भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक वीर जवानांनी आपल्या प्राणाची परवा न करता त्यामध्ये सर्वात अग्रेसर असणारे शहीद वतन देशाचे पहिले मिसाईल मॅन टिपू सुलतान भारतीय संविधानाच्या महत्वाच्या शहिदांच्या यादीमध्ये टिपू सुलतान यांचे नाव लिहिलेले आहे. संपूर्ण भारतात टिपू सुलतान यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो या दिवसाचे महत्व लक्षात घेऊन माळेगाव येथील प्रतिष्ठित नागरिकांनीही आवर्जून उपस्थिती लगाउन ही जयंती साजरी केली. यावेळेस टायगर ग्रुप च्या मंडळी सह तेल्हारा पोलीस स्टेशनचे बीड जम. प्रशांत सर व गावातील उपसरपंच सलीम खान, शेख इस्ताक, अमर शहा. बरकत शहा, शेख असलम, शेख फिरोज, शेख इमरान,शेख मुस्ताक,शेख गफूर याचेसह इतर मान्यवर तसेच ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button