महाराष्ट्र

साध्वी चंम्पा माता मंदिर माळेगांव बा.ता.तेल्हारा येथे नवरात्री उत्सवानिमित्त सौ.कोमलताई चिमणकार (जिल्हा सह.संचालिका विश्वहिन्दु परिषद) यांचे महिला सशक्तीकरण व आजची तरुणाई या विषयावर व्याख्यान

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा तालुका प्रतिनिधी विजय घोडे.

माळेगाव बा./तेल्हारा दि.२२; तेल्हारा तालुक्यातील साध्वी चंम्पा माता मंदिर माळेगाव बा. येथे नवरात्री उत्सवानिमित्त नवरात्री च्या नऊ दिवसाला साध्वी चंम्पा माता नवरात्री उत्सव मंडळा तर्फे मंदिर परिसरात रविवार दि.१५ आक्टों.२०२३ ते सोमवार दि.२३ आक्टों.२०२३ या दरम्यान संस्कृती पुरक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यामध्ये गुरूवार दि.१९ आक्टों.२०२३ रोजी मनब्दा येथील व्याख्यात्या सौ.कोमलताई चिमणकार ,राष्ट्र सेविका समिती (तेल्हारा नगर सहकार्यवाहिका) विश्व हिंदु परिषद अकोला जिल्हा ग्रामिण सह संयोजिका. (जिल्हा सह.संचालिका विश्वहिन्दु परिषद). याचे महिला सशक्तीकरण व आजची तरुणाई या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते व्याख्यानामध्ये त्या म्हणाल्या की,आजच्या संस्कारशून्य तरुण पिढीला संस्कृती व परंपरा याचाच विसर पडलेला सकृतदर्शनी पाहावयास मिळत आहे. पूर्वी पालक आपल्या मुलांच्या बाबतीत जागरूक असायचे, त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी त्यांच्यावर संस्कार करायचे. मुलांमध्ये सुद्धा आई-वडिलांविषयी आदर असायचा. त्याचप्रमाणे शाळेमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांवर संस्कारांची जोपासना करीत असायचे. मुले ही देवाघरची फुले समजून त्यांची जोपासना व्हायची. यासाठीच पूर्वी एकत्र कुटुंबात लहान मुलांवर संस्कार व्हावे म्हणून शुभंकरोती, रामरक्षा, मनाचे श्लोक इत्यादी म्हणण्याची सक्ती केली जात असे. तर आजी-आजोबा रात्री झोपताना मुलांना देवादिकांच्या, संतांच्या कथा सांगत असत. त्यामुळे मुलांवर उत्तम संस्कार होत होते. सातच्या आत घरात, असा तेव्हाचा परिपाठ होता; परंतु आता जग जवळ आले आहे. संस्कृतीची देवाणघेवाण होऊ लागली आहे. आपली संस्कृती स्वीकारण्यासाठी पाश्चात्त्य लोक येथे येऊन राहात आहेत, तर आपण मात्र पाश्चात्त्यांचे अनुकरण करू लागलो आहोत.आजची तरुण पिढी सज्जनांची संगत घेण्याचे टाळून दुर्जनांच्या विळख्यात सापडू लागले आहेत. त्यामुळे ते व्यसनाच्या आहारी जाऊन आपले जीवन उद्ध्वस्त करीत आहेत. पौष्टिक दुधाऐवजी अंमल चढवणा-या मद्याचा ग्लास हातात धरणारी आजची तरुण पिढी गांजा, चरस, गर्द पावडर, हेरॉईन, ब्राऊन शुगर इत्यादी मादक पदार्थाच्या व्यसनात गुरफटत आहे. घरचे सात्विक अन्न सेवन करायचे सोडून जिभेचे चोचले पुरविण्यासाठी हॉटेलमधील अन्न, चायनीज पदार्थ, जंक फूडसारखे पदार्थ खाऊन रोगराईला आमंत्रण देत आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांचे आरोग्य बिघडत आहे.
टीव्ही ,मोबाईल,या सारखी प्रसार माध्यम हे सुद्धा सध्याची पिढी बिघडण्याचे एक कारण होत आहे. कोणत्याही साधनाचा उपयोग कसा करायचा यावर त्याचे फायदे-तोटे अवलंबून आहेत. टीव्हीवर व मोबाईल वर मनोरंजनाचा खजिना असतो असे म्हणतात. मात्र मनोरंजनाच्या नावाखाली कधी कधी बीभत्स दृष्ये दाखविली जातात. त्याचप्रमाणे मालिकांमध्ये कुटुंबा-कुटुंबात कलह निर्माण करणारी दृष्ये असतात. त्यावेळी प्रश्न पडतो की, समाजात चांगली माणसे जन्माला येतच नाही का? अशा मालिका पाहून विभक्त कुटुंब पद्धती जोर धरू लागली आहे. अशा कुटुंब पद्धतीत नवरा-बायको दोघे आणि त्यांना एक मूल.. झाले एक सुखी कुटुंब. या तिघांमध्ये चौथा कोणी नको असतो. नवरा-बायको कामाला गेल्यानंतर मूल घरी एकटे असते. त्याला सांभाळायला एक बाई ठेवलेली असते. मात्र ते मूल अकलेत आल्यानंतर त्याला त्या बाईची अचडण होते. ते एकटे राहू इच्छिते. पैसे कमवायला बाहेर पडलेले आई-वडील मुलाच्या इच्छेनुसार वागतात. आता त्या मुलाला मोकळे रान मिळते. आई-वडील कामाला, घरी ते मूल एकटे.त्याच्या सुखासाठी घरी अत्याधुनिक साधने असतात. मग ते मूल मुलगा असो वा मुलगी; मन मानेल तसे वागू लागते. घरात मित्र-मैत्रिणींच्या पाटर्य़ा होतात. पाटर्य़ाच्या संगतीला विविध प्रकारचे व्हीडिओ पाहिले जातात. टीव्ही माध्यमाद्वारे दाखविण्यात येणा-या अवास्तव मालिका, सिनेमे मुले पाहत असल्यामुळे ते आपले वास्तव जीवन विसरतात. एवढेच नव्हे तर टीव्हीवर काही मालिकांमधून दाखविण्यात येणा-या स्त्री देहाचे बीभस्त, अश्लील असे विकृत स्वरूपातील चित्रण पाहून मुलांच्या लैंगिक भावना चाळवल्या जात असल्यामुळे तरुण पिढी वेश्यागमनाकडे आकर्षित होऊन एड्ससारख्या महाभयंकर आजाराच्या विळख्यात सापडत आहे. विशेषत: कोणतेही काम न करता विलासी ऐश्वर्यसंपन्न जीवनाची स्वप्ने पाहणारी आजची तरुणाई झटपट पैसे कमविण्याच्या हव्यासापोटी मटका, जुगार, लॉटरी अशा वाममार्गाकडे वळून आपले आयुष्य उद्ध्वस्त करीत आहे.पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती होती. त्यामुळे कुटुंबातील थोरांकडून मुलांवर संस्कार होत होते. घरात एक आदर्शवत व्यक्ती असायची. त्याच्या आज्ञेबाहेर कोणी वागत नसे. त्याने जाब विचारल्यास कोणी उद्धट बोलत नसे. परंतु आज विभक्त कुटुंब पैसे कमविण्याच्या नादात आपल्याच मुलांवर संस्कार करण्यात उदासीनता दाखवीत असल्यामुळे आजची तरुणाई भरकटत आहे. आई-वडील कामावर जात असल्यामुळे कुटुंबातील संवादच नष्ट झाला आहे. एवढेच नव्हे तर नोकरी करण्याच्या नादात त्यांना आपल्या मुलांना वेळ देता येत नाही. त्यासाठी आई-वडील त्यांना वारेमाप पैसे, मागेल ती वस्तू देऊन त्यांना खूश करण्याचा प्रयत्न करतात, अशी मुले मित्रांच्या सहवासात येऊन आपले आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतात. काही मुले आई-वडिलांच्या प्रेमाला विसरल्यामुळे नैराश्येच्या गर्तेत जातात.अशा स्वरुपाच्या विषयावर त्यांनी व्याख्यान केले. कार्यक्रमा प्रसंगी साध्वी चंपा माता नवदुर्गा उत्सव मंडळा तर्फे व्याख्याता सौ.कोमलताई चिमणकार यांचे रूशाली बाबजी आमले यांनी शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button