बुलढाणामहाराष्ट्र

सातपुडा स्ट्रायकर्स  संघ  ठरला श्री. संत सावता माळी प्रिमियर लीगचा विजेता

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली (प्रतिनिधी)
आरुना दत्तात्रय खंडागळे

खिलाडीवृत्तीनेचं प्रत्येक स्पर्धा व्हाव्यात : राहुलभाऊ बोंद्रे

चिखली : क्रीडा स्पर्धेमुळे युवकांमध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित होतात. तसेच अशा स्पर्धांमुळे स्थानिक खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची मोठी संधी मिळते. खेळाडूंनी स्वच्छ, निष्पक्ष आणि प्रामाणिक खेळ करत क्रीडाभावना जपली पाहिजे. खेळाडूंनी स्पर्धा खेळताना नेहमीच खिलाडीवृत्ती जपली पाहिजे. खेळात कोणत्याही प्रकारचे राजकारण येऊ देऊ नये, खिलाडीवृत्तीनेचं प्रत्येक स्पर्धा व्हाव्यात, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी केले.

श्री संत सावता माळी प्रिमियर लीग २०२६ च्या बक्षिस वितरणच्या कार्यक्रमात ते बोलत होते. श्री. संत सावता माळी प्रिमियर लीगचा अंतिम सामना शनिवार २१ मार्च रोजी अत्यंत उत्साहपूर्ण आणि जल्लोषात संपन्न झाला. डॉ. शैलेश भराड यांचा सातपुडा स्ट्रायकर्स संघाने उत्कृष्ट खेळ करत प्रथम क्रमांक पटकावला. तर स्वप्नील खरात यांच्या नेतृत्वाखालील श्री कार डेकोर संघाने दमदार कामगिरी करत द्वितीय क्रमांक मिळवला. विजेत्या आणि उपविजेत्या संघासह इतर बक्षिसांचे वितरण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे, सातपुडा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ.स्वातीताई वाकेकर, मुंगसाजी महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष दिपक देशमाने यांच्या हस्ते पार पडले. यावेळी विजेत्या व उपविजेत्या संघांना आकर्षक पारितोषिके, ट्रॉफी व सन्मानचिन्ह देण्यात आले. प्रथम पारितोषिक योगेश भाऊ जाधव यांच्या वतीने 21 हजार तर द्वितीय बक्षीस दीपक भाऊ देशमाने यांच्या वतीने 11 हजार रुपये ठेवण्यात आले होते. याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर आणि उदयोन्मुख खेळाडू यांनाही विशेष पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

भविष्यातही अशा स्पर्धांचे आयोजन व्हावे : स्वातीताई वाकेकर

श्री संत सावता माळी प्रिमियर लीग स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल सातपुडा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा  स्वातीताई वाकेकर यांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले. यावेळी त्यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व आठ संघांचेही मनापासून अभिनंदन केले. कमी वेळेत शिस्तबद्ध आणि यशस्वी पद्धतीने स्पर्धा पार पाडल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत भविष्यातही अशा स्पर्धांचे आयोजन करून क्रीडा क्षेत्राला चालना द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी नगरसेवक दिपक खरात, गोपाल डेव्हडे, प्रकाश सपकाळ, नगरसेवक प्रशांत भटकर, विजय जागृत, ॲड विलास नन्हई, विलास घोलप, अनिल जैवाळ,डॉ अमोल लहाने, राम बनसोडे, भारत खरात,, सुभाष खरात,, देविदास सुरुशे,, विजय जागृत, बंडू खरात, रत्नदीप शिनगारे, डॉ शिवशंकर खेडेकर, मनोज लाहुडकर, सूचित भराड यांच्यासह चिखलीकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.विलास नन्हई आणि नगरसेवक दीपक खरात यांनी भेट दिली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button