बुलढाणामहाराष्ट्र
ट्रॅव्हलची आटोला जोरदार धडक एक महिला ठार व पाच गंभीर जखमी…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी हरिदास इंदोरे जळगाव जामोद
उपबाजार समितीच्या समोर ट्रॅव्हल्स व ऑटो रिक्षामध्ये 22 मार्च संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास भीषण अपघात होऊन एक महिला ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की जळगाव जामोद वरून पुणे करिता जाणारी ट्रॅव्हल्स क्रमांक जी जे 14 डब्ल्यू 0541 तसेच ऑटो रिक्षा क्रमांक 19 बी. जे.2825 हे नांदुरा वरून आसलगाव येत असताना महामार्ग 161 आसलगाव नजीक उपबाजार समितीच्या समोर ट्रॅव्हल्स ने ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिल्याने त्यामध्ये आसलगाव येथील महिला जय श्री किशन उद्धट वय वर्ष 38 ही महिला जागीच ठार तर , गजानन सोळंके वय वर्ष 45, गोपाल श्रीकृष्ण उद्धट वय वर्ष 12, वंदना अनिल मेहंगे वय वर्ष 35, नंदा प्रकाश डाबेराव वय वर्ष 39 सर्व राहणार आसलगाव व मंगला भीमराव लोथे वय वर्ष 45 राहणार काजेगाव हे सर्वजण गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम जळगाव जामोद येथे उपचार येथे रेफर करण्यात आले व नंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना खामगाव येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. त्यानंतर संतप्त जमावाकडून ट्रॅव्हलची तोडफोड करण्यात आली.
सदर ट्रॅव्हल चालक जगदेव देवचंद राठोड राहणार पाचोरा जिल्हा जळगाव यांच्या विरुद्ध भारतीय न्याय सहिता बी एन एस 2023 106 (1)281 125(ए )125(ए ) मोटर वाहन अधिनियम 1988 नुसार184 गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास ठाणेदार नितीन पाटील जळगाव जामोद यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.



