बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

दहिगाव येथे ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ शाखेचे दिमाखात उद्घाटन….!​शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघटित व्हा ! प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांचे आवाहन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

​तेल्हारा २३ मार्च २०२६
तालुक्यातील दहिगाव येथे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या नवीन शाखेचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या हस्ते या शाखेचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. ​याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना प्रशांत डिक्कर म्हणाले की, “संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य पक्ष राज्यभर पायमुळे घट्ट करत आहे. शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आमचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरून लढत आहे. ‘गाव तेथे शाखा आणि घर तिथे शिवविचार’ पोहोचवण्यासाठी युवकांची मोठी फळी सक्रिय झाली आहे.”​तेल्हारा तहसीलवरील काढलेला ऐतिहासिक मोर्चाचा उल्लेख करत डिक्कर पुढे म्हणाले की, “कर्जमुक्तीसाठी स्वराज्य पक्षाने काढलेल्या त्या पहिल्या धडक मोर्चाचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले.आणि शेतकरी चळवळीतील नेत्यांची मोठी वज्रमूठ बांधली, त्यामुळेच सरकारला झुकून कर्जमाफी जाहीर करणे भाग पडले. ही शेतकऱ्यांच्या एकजुटीची ताकद आहे. आता विदर्भातील मुख्य पीक असलेल्या कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळवण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा संघटित होऊन सरकारला आपली खरी ताकद दाखवावी लागेल.”या सभेला स्वराज्य पक्षाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष गोपाल पाटील, आशिष शेळके, रोहित पाटील ताथोड, यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले, ​यावेळी प्रमुख उपस्थिती सरपंच रविकिरण काकड, उपसरपंच धरमसिंग सोंळके, शाळा समिती अध्यक्ष दुर्गेश सोळंके, स्वप्निल भारसाकडे,शाखा अध्यक्ष शुभम ईसापुरे, शुभम चिंचोलकर,विद्याधर अवताळे,अमोल लोणाग्रे,सचिन जुमळे,हरिश महाले, मंगेश जस्ताब,मुन्ना ईंगोले,शंकर जुमळे,विकी महाले,संंदीप दांदळे उपस्थित होते, कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अक्षय अवताळे यांनी पाहले, आगामी काळात गावागावात पक्ष संघटन मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.यावेळी गावातील शेतकरी-शेतमजूर व युवकांची बहुसंख्येने उपस्थिती होती…..

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button