समाजकार्यकर्ती पद्माताई जाधव यांचा वाढदिवस साजरा

दिनांक :- २१ एप्रिल २०२४ रविवार
मुंबई विरार:-
जिज्ञेशा महिला मंडळ, बोधीसत्व सत्यशोधक महिला मंडळ अध्यक्षा, महाराष्ट्र पोलीस बॉय संघटनेच्या तालुका अध्यक्ष. शिवसेना उप शहर संघटक विरार पूर्व. सौ. पद्मा मंगेश जाधव यांचा ५० वा जन्म दिवस दिनांक २१/४/२०२४ रोजी साजरा करण्यात आला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या कुंटूंबियांन सोबत शिवसेना जिल्हा संघटक सौ. शितल ताई कदम, उप तालुका संघटक सौ. अर्पिता ताई, शहर प्रमुख श्री. उमेश दादा, विभाग प्र.साटम भाऊ तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. गर्भ सामाजिक संस्था यांचे पदाधिकारी बाळू साळवे व कोळी दादा, प्रबुद्ध सामाजिक संस्था यांचे पवार भाऊ, म. पो. बॉ. सं महिला आघाडी, तसेच त्यांच्या मंडळाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. हा रौप्य महोत्सवी सोहळा अवस्यमरणीय असा साजरा झाला. उपस्थित मान्यवरांच्या शुभेच्छा व आशीर्वादाने हा सोहळा पार पडला.



