बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ
संत निरंकारी मंडळाच्या वतीने पोलीस वसाहत व न्यायालय या ठिकाणी वृक्षारोपण उत्साहत संपन्न

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी-संजय खेडेकर
चिखली :-
वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचाकार्यक्रम पोलीस वसाहत व न्यायालय या ठिकाणी चिखली येथे नुकताच अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
या प्रसंगी *चिखली ब्रँच चे मुखी तथा बुलडाणा जिल्हा संयोजक प.आ. शालिकराम जी चवरे गुरुजी तसेच चिखली पोलीस स्टेशन चे ठाणेदार भूषण गावंडे, पोलीस उपनिरीक्षक गाडे मॅडम, सेवादल संचालक दिपक इंगळे सेवादल संचालिका द्वारका काळे, नगरसेवक गोकुळ शिंगणे, रुपराव इंगळे मीडिया सहायक तथा पत्रकार विनोद चव्हाण व मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून वृक्षांचे मानवी जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व, पर्यावरणाचे संरक्षण आणि वृक्षसंवर्धनाची आवश्यकता याबाबत उपस्थित साधसंगतला मोलाचे मार्गदर्शन केले. वृक्ष हे केवळ निसर्गाची शोभा नसून मानवाच्या निरोगी व सुखी जीवनाचा आधार आहेत, हा सुंदर संदेश यावेळी देण्यात आला.
या सेवाकार्यात सर्व साधसंगत, सेवादलाचे अधिकारी, सेवादल, महात्मे व बहिणजींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पर्यावरण संवर्धनाच्या या पवित्र कार्यात आपले योगदान दिले.
वृक्षारोपण ही केवळ सेवा नसून भावी पिढीच्या सुंदर व निरोगी भविष्याची जबाबदारी आहे.
सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन आशीर्वादाने आयोजित या सेवाकार्यात सहभागी होण्याचे सौभाग्य लाभल्याबद्दल सर्वांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.





