बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

पोलीस स्टेशन चिखली हदी मध्ये आगामी सण उत्सव ईद – ए – मिलाद…..

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
चिखली तालुका प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे

आज दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी पोलीस स्टेशन चिखली हद्दीमध्ये आगामी सण उत्सव ईद-ए-मिलाद चे अनुषंगाने चिखली शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व सदरचा उत्सव शांततेत पार पडावा या हेतूने 17.00 ते 18.00 वाजे दरम्यान रूट मार्च चे आयोजन करण्यात आले होते. सदर रूट मार्च दरम्यान दंगा काबु योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली. आजच्या या रूट मार्च व दंगा काबु योजनेचे तालीम करिता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री भूषण गावंडे ठाणेदार चिखली, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक श्री शरद भागवतकर, श्री सचिन ठेंग, श्री प्रमोद हुसे असे अधिकारी, व पोलीस स्टेशनचे 41 महिला व पुरुष अंमलदार तसेच 62 पुरुष व महिला होमगार्ड हजर होते.

सदरचा रूट मार्च पोलीस स्टेशन मधून निघून बाबुलॉज चौक राजा टावर, बैलजोडी चौक, काझी मज्जिद, बजरंग दूध डेअरी, बाराभाई मोहल्ला, परत काझी मज्जिद, बैलजोडी चौक, बागवान गल्ली, नगरपरिषद चौक मार्गे पोलीस स्टेशन मध्ये समाप्त करण्यात आला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button