चिखलीत आज मातंग समाजाचा जनआक्रोश विराट महामोर्चा ! मोठ्या संख्येने सहभागी व्हा ; सामाजिक नेते भाई छोटू कांबळे यांचे आवाहन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
आवाज न्यायाचा
अरुणा दत्तात्रय खंडागळे
चिखली प्रतिनिधी
चिखली: अनुसूचित जाती आरक्षणाच्या ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ सोमवार दि. १२ ऑक्टोबर रोजी चिखलीत सकल मातंग समाजाच्या वतीने जनआक्रोश विराट महामोर्चा व महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता क्रीडा संकुलातून महामोर्चाला प्रारंभ होणार असून, तहसील कार्यालय परिसरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ महासभेचा समारोप होणार आहे.
या महामोर्चाला महाराष्ट्रातील विविध दिग्गज नेते व मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
आरक्षणाचे उपवर्गीकरण करून वंचित, उपेक्षित घटकांना न्याय्य हक्काचा वाटा मिळावा, यासाठी समाजाने एकजुटीने पुढे येणे गरजेचे आहे. सामाजिक न्यायाच्या या लढ्याला बळ देण्यासाठी समाजबांधव, महिला, युवक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने महामोर्चात सहभागी व्हावे,” असे आवाहन सामाजिक नेते भाई छोटू कांबळे यांनी केले आहे



