खानदेशजळगावा जिल्हा

पती कामावर, मुले शाळेत, विवाहितेने घेतला घरात टोकाचा निर्णय !

जळगाव स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी रणधीर पवार

| १ ऑगस्ट २०२४शहरातील कानळदा रोडवरील ओम साई नगरातील एका ४४ वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दि. ३० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राणी शामकांत देशमुख वय ४४ रा. ओम साई नगर, जळगाव असे मयत महिलेचे नाव आहे.सविस्तर वृत्त असे कि, जळगाव शहरातील कानळदा रोडवरील ओम साई नगरात राणी देशमुख या महिला पतीसह दुर्गेश आणि दर्शन ही दोन मुलांसह वास्तव्याला होत्या. पती शामकांत देशमुख हे एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला आहे. मंगळवारी ३० जुलै रोजी दुपारी दोन्ही मुले शाळेत गेली होती. तर पती हे कामाला कंपनीत निघून गेले. दरम्यान, घरात कुणीही नसतांना महिलेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आले नाही. सायंकाळी ५ वाजता दोन्ही मुले घरी आले तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शर्मा यांच्यासह पोहेकॉ अनिल फेगडे, पो.कॉ. अनिल मोरे, रामकृष्ण इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला. मयत महिलेच्या पश्चात पती आणि दोन मुले असा परिवार आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button