क्राईम

संतापजनक : १० वर्षांच्या बालकावर अनैसर्गिक अत्याचार; नराधम फरार

संतापजनक : १० वर्षांच्या बालकावर अनैसर्गिक अत्याचार; नराधम फरार

जामनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जामनेर शहरातील मदनी नगर परिसरात मानवतेला लाजवणारी घटना घडली आहे. दळण आणण्यासाठी गेलेल्या १० वर्षांच्या निष्पाप बालकावर २५ वर्षीय नराधम साद खान जहीर खान याने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, आरोपी साद खान याने बालकाला फुसलावून जवळ बोलावले आणि अश्लील कृत्य केले. इतकेच नाही तर ही घटना कोणाला सांगितल्यास तुला आणि तुझ्या चुलत्याला संपवून टाकू, अशी धमकी दिली. बालकाने घाबरत आपल्या कुटुंबाला हा प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांनी तात्काळ ‘पोक्सो’ (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीला पकडण्यासाठी पथके रवाना केली आहेत. आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button