जळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्र

बाल सुसंस्कार शिबिर हि काळाची गरज”… हभप विठ्ठल महाराज तेल्हारकार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

निःशुल्क बाल सुसंस्कार शिबीरात विद्यार्थ्यांचा होत आहे सर्वांगीण विकास आधुनिक काळाचा विचार करता देव देश धर्म संस्कृती व साधुसंताच्या विचाराकडे दुर्लक्ष करुन तरुण पिढी दुर्व्यसनात्त्या आहारी जाऊन आपल आयुष्य मातीमोल करत आहेत कारण संस्काराचा अभाव आपल्या जीवनाच ध्येय लक्षात घेऊन आपल्या मुलांच भविष्य सुख समृद्धी आनंदात जावे या करिता प्रत्येक आईवडीलांच कर्तव्य आहे की मुलांना योग्य वयामध्ये योग्य संस्कार मिळणे अत्यंत गरजेचे आहे या उद्देशाने उन्हाळ्याच्या सुट्टि मध्ये बाल सुसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्वभाविकांनी या विश्वमानव कल्यानात्त्या महायज्ञामध्ये तन मन धनाने सहकार्य करावे असे आवाहन शिबिराचे आयोजक श्री.ह.भ.प.विठ्ठल महाराज तेल्हारकर यांनी केले आहे.जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सर्वांगीण विकास बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन हिवरखेड येथील सरकारी दवाखान्यामागील जि. प. प्राथमिक शाळेत दि 1 मे ते 20 मे 2026 पर्यंत सुरु आहे. शिबिराचे आयोजन श्री.ह.भ.प. विठ्ठल महाराज तेल्हारकर यांनी केले आहे.शिबिरात प्रामुख्याने देवभक्ती, देशभक्ती, धर्मभक्ती, मातृ-पितृभक्ती, शास्त्रशुध्द सुसंस्कार, कीर्तन, प्राणायाम, योगासने, प्रवचन, भजन, गायन , वादन , मृदंग, टाळ, श्रीमद् भगवद् गिता १५ वा अध्याय व निवडक श्लोक या विषयांचे धडे विद्यार्थ्यांना मिळत आहेत.शिबिराला प्रमुख उपस्थिती म्हणून रामायनाचार्य श्री ह भ प संजयजी महाराज पाचपोर (गुप्तेश्वर संस्थान शिर्ला नेमाणे) सर्वदर्शनाचार्य श्री ह भ प पुरुषोत्तमजी महाराज बावस्कार (जय श्रीराम आश्रम गाडेगाव खुर्द) भागवताचार्य श्री ह भ प ज्ञानेश्वरजी महाराज वाघ (ज्ञानेश आश्रम वारी भैरवगड)श्री ह भ प वैराग्यमुर्ती भोजने महाराज भक्त परीवार (श्री क्षेत्र अटाळी) लाभले. तसेच विद्यार्थ्यांवर संस्कार घडविण्यासाठी शिक्षकवृंद म्हणून श्री ह भ प जगन्नाथ महाराज कोरडे हिंगणी बु.,श्री ह भ प विनायक महाराज भोपळे निमगाव, श्री ह भ प गोपाल महाराज अवकाळे माळेगाव गोंड,श्री ह भ प अनिल महाराज देशमुख मेहकर, श्रीमती ह भ प सरस्वतीबाई गोतमारे धामणगाव, श्री.ह.भ.प. कमलाबाई साबळे अकोली जहागीर, श्री.ह.भ.प. विठ्ठल महाराज तेल्हारकर व श्री. प्रदिपजी नागापुरे हिवरखेड इत्यादी सेवा देत आहेत.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदीप नागापुरे गुरुजी, शंकरराव घावट, रवी भड, सदाशिव गायकी, पुंडलिक व्यवहारे, सुरेश भोम, महेंद्र तेल्हारकर, भास्कर तेल्हारकर, विलास शितोडे, वैभव ओंकारे, तुषार इंगळे, महिला मंडळ, यासह अनेक गावकरी परिश्रम करून सेवा देत आहेत.*एकादशीच्या फराळाची पंगत ठरली लक्षवेधी..मान्यवरांनी दिल्या भेटी*शिबिरातील विद्यार्थ्यांसाठी दररोज सकाळी दूध, नाश्ता, चहापाणी, फळे, दोन वेळचे जेवण असा परिपूर्ण आहार विद्यार्थ्यांना मिळावा याची व्यवस्था आयोजकांनी केली आहे त्यासाठी हिवरखेड सह परिसरातील दानशूर व्यक्ती मोठ्या मनाने मदत करीत आहेत त्यामध्ये प्रतिष्ठित नागरिक श्री. संतोष महादेवरायजी बजाज यांच्यातर्फे एकादशीच्या फराळाची पंगत विद्यार्थ्यांसाठी लक्षवेधी ठरली ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी फराळाच्या विविध लज्जतदार पकवानांचा मनमुराद आस्वाद घेतला. यावेळी अनेक प्रतिष्ठित मान्यवरांनी आणि पत्रकार बांधवांनी शिबिराला भेट दिली. संतोष बजाज, डॉ.मुरलीधर अग्रवाल, नगरसेविका सौ. शीतल पोके, सौ. उमा बजाज, सौ. मयुरी बजाज, रविंद्र माधानी, राजेश जयनारायणजी अग्रवाल, राजेश मोहनलालजी अग्रवाल, सुनिल बजाज, पंकज अग्रवाल, प्रमोद पोके, रितेश टिलावत, विकास गुप्ता, नयन अग्रवाल, अर्जुन खिरोडकार, सुरज चौबे, जितेश कारिया, अनिल कवळकार, पावन बजाज, गोविंद अग्रवाल धिरज बजाज, अक्षत बजाज, इत्यादी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button