अकोलाबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

संग्रामपुर तालुक्यातील आलेवाडी गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई, दूषित पाण्यामुळे गावात किडनीग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ, ग्रामपंचायत व बीडिओ यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,

संग्रामपूर तालुका प्रतिनिधी, रतन भगत.

संग्रामपूर दिनांक ८/७/२६ सविस्तर वृत्त असे की संग्रामपूर तालुक्यातील आलेवाडी गावात सध्या पिण्याचे पाण्याची भीषण अशी पाणी टंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः वन वन भटकावे लागत आहे. प्रत्यक्षात म प्रशासनाविरोध तीव्र संताप व्यक्त केल्या जात आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गावातील नळ योजना अनेक दिवसांपासून अस्तित्वात नाही. याबाबत ग्रामपंचायत तसेच पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. विशेषता गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत प्रशासन या गंभीर समस्या कडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही केवळ पिण्याच्या पाण्यासाठी पैसे खर्च करावे लागत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. आधीच गावातील क्षारयुक्त पाण्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. गावात उपलब्ध असलेले पाणी मोठ्या प्रमाणात क्षारयुक्त असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. हे पाणी दीर्घकाळ पिल्यामुळे गावात किडनीच्या आजारांचे प्रमाण वाढत असल्याची गंभीर बाग समोर आली आहे. अनेक नागरिकांना उपचारासाठी शहरांकडे धाव घ्यावी लागत असून आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे.
ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा
पाण्याच्या प्रश्नावर तातडीने कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाची चौकशी करून लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. लवकरच प्रशासनाने लक्षण दिल्यास तीव्र आंदोलन सोडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. गावकऱ्यांच्या मते शासनाच्या योजना कागदावरच दिसतात प्रत्यक्षात मात्र आम्हाला पाणी विकत घेऊन प्यावे लागत आहे. पाणी हा आमचा मूलभूत हक्क असून प्रशासनाने आता तरी जागे व्हावी अशी भावना संतप्त नागरिक व्यक्त करीत आहेत.
मागील अनेक वर्षापासून आलेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत जलजीवन मिशन योजनेवर लाखो रुपये खर्च करण्यात आले. परंतु प्रत्यक्षात योजना अस्तित्वात कुठेच येऊन दिसत नाही .त्यामुळे या संपूर्ण भाऊ वर कारभाराची व खर्च झालेल्या विकास कामांची सखोल अशी चौकशी होणे खूप गरजेचे आहे.
कासम सुरत्ने सामाजिक कार्यकर्ता यांनी संबंधित माहिती दिली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button