बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ
श्री शिवाजी महाविद्यालयात “जागतिक युवा कौशल्य” दिन साजरा

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
चिखली तालुखा: प्रतिनिधी
चिखली – येथील श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयात जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून करिअर कट्टा च्या करिअर संसद पदाधिकारी यांचा शपथविधी व प्रमाणपत्र वितरण सोहळा दि.१५/०७/२०२६ रोजी पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर.पडोळे हे होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाविद्यालय समन्वयक प्रा. एस. एन. पवार यांनी करिअर संसद व शपथविधी सोहळ्याचा उद्देश विषद केला.
या सोहळ्यात ११ नवनिर्वाचित करिअर संसद पदाधिकारी यांनी शपथ ग्रहण केली. तसेच मान्यवरांच्या हस्ते संसद पदाधिकारी यांना प्रमाणपत्र व दैनंदिनी यांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पी. आर. पडोळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.आभार प्रदर्शन प्रा. एस. एस. गायकवाड महाविद्यालय समन्वयक यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.✍️



