बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शेतात काम करीत असताना, रानडुकराच्या हल्ल्यात 2 महिला जखमी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी :गजानन तांगडे खामगांव

शेतात काम करीत असताना रानडुकराने चढविलेल्या हल्ल्यात 2 महिला जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास तालुक्यातील कोलोरी येथे घडली.प्राप्त माहितीनुसार यशोदा मारुती गुधदे वय ६५, रंजना दुर्योधन शिरसाट वय ४८ रा. कोलोरी असे जखमी झालेल्या महिलांची नावे आहेत.त्यांना त्यांचे नातेवाईक आदित्य शिरसाट यांनी रुग्णालयात दाखल केले.खामगाव सामान्य रुग्णालयातील वार्ड क्रमांक 3 मध्ये उपचार सुरू आहेत. वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थित असल्याचे समजते. या घटनेमुळे कोलोरी शेत शिवार भीतीचे वातावरण पसरले आहे.
गत काही दिवसापासून वन्यजीवांचा उपद्रव्य वाढीस लागल्यामुळे शेतामध्ये काम करीत असताना चिंतेचे वातावरण आहे.
वन विभागाने याबाबत उपाययोजना करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button