बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

साहित्यरत्न डॉ अण्णा भाऊ साठे यांची १०६ जयंती लोखंडा गावात मोठ्या उत्साहात साजरी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

लहुजी शक्ती सेना आयोजित साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे जयंती उत्सवाची सुरुवात अनंता भाऊ सकळकळे लहुजी शक्ती सेना ता. अध्यक्ष खामगांव यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विलास भाऊ भागवत उपसरपंच ग्रा.लोखंडा व उद्घाटक महादेव रावजी ढगे सामाजिक कार्यकर्ते पारखेड यांच्या हस्ते डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. सूत्रसंचालन गजानन भाऊ सकळकळे लहुजी शक्ती सेना जिल्हा सचिव यांनी केले. योगेश घोडे,अनंता सकळकळे,पुंजाजी हिवराळे,गजानन भाऊ सकळकळे यांनी डॉ. अण्णा भाऊ साठे यांचे वाटेगाव ते रशिया संघर्षमय जीवनचरित्र रेखाटले. यावेळी कार्यक्रमास भिका भालेराव,ओंकार भालेराव,श्रीकृष्ण खरात,हरी भालेराव,राम जाधव पृथ्वीराज दांडगे,शिवाजी ढगे पाहुणे उपस्थित होते आणि सकल मातंग समाज उपस्थित होता. कार्यक्रम संपन्न झाल्यावर डॉ.अण्णा भाऊ साठे यांची तैलचित्राचे मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात लोखंडा गावातून काढण्यात आले. मिरवणुकीत महापुरुषांच्या घोषणांचा जयजयकार करण्यात आला. बंदोबस्त साठी हिवरखेड पोलीस स्टेशनचे बंसै साहेब, ज्ञानदेव डाबेराव साहेब,यांनी पदभार सांभाळला अशा प्रकारे डॉ.अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button