गुन्हेगारीमहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीचा विनयभंगमालेगाव पोलीस स्टेशन मध्येआरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगांव : – तालुक्यातील एका गावातून मालेगांव शहरातील प्रख्यात शाळेत शिक्षण घेत असलेल्या नवव्या वर्गातील अल्पवयीन विद्यार्थिनीचा एकाने शाळेच्या गेटवर हात पकडून विनयभंग केल्याची घटना घडली. पिडीतेच्या फिर्यादीवरुन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याच प्रकरणी मागील वर्षी सदर आरोपीहातुरुंगात गेला होता. तुरूंगातुन बाहेर येताच त्याने पुन्हा त्याच मुलीला त्रास देऊन जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडितेच्या आई- वडिलांचे बालपणीच निधन झाले असून, पीडित १५ वर्षीय मुलगी आपल्या काका-काकू बरोबर एका खेड्या मधे राहतें. पीडित विद्यार्थीनी मालेगाव शहरातील एका प्रख्यात शाळेत नवव्या वर्गात शिकते, त्यासाठी ती आपल्या गावातून रोज येणे जाणे करते. पीडितेच्या घरापासून काही अंतरावर राहणारा आरोपी गणेश नंदू कांबळे हा पीडित मुलीचा शाळेत जात असताना नेहमी पाठलाग करायचा. २०२३ मध्ये पीडितेने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी
तुरुंगात गेला होता. मंगळवार, २० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता पीडिता तिच्या गावावरून बसने शाळेत पोहोचली तेव्हा आरोपीने शाळेच्या गेटवर तिचा हात पकडून तुझ्यामुळेच आपणतुरुंगात गेल्याचे सांगत तिला स्वतः सोबत येण्यास सांगून न आल्यास जीवाने मारण्याची धमकी दिली. पीडितेने हाताला झटका देत आपला हात सोडवून शाळेकडे धूम ठोकली, वर्गात पोहचून झालेला प्रकार वर्गशिक्षकाला सांगितला. वर्गशिक्षक बाहेर आलेले पाहून आरोपी तिथून निघून गेला. घरी पोहोचल्यानंतर पीडितेने तिच्या काकांना घटनेची माहिती दिली, त्यानंतर बुधवार, २१ ऑगस्ट रोजी काकांसह मालेगांव पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून मालेगाव ठाण्यात गुन्हा नोंदवून लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या १२ व ८ सोबत भारतीय न्याय संहितेच्या ३५१(२), ३५१(३), ७४, ७८ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग इंगळे करीत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button