शेगाव तालुक्यामध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन सोहळा संपन्न

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलढाणा जिल्हा ग्रामिण प्रतीनीधी ऋषिकेश देठे
शेगाव तालुक्यातील कालखेड येथे रस्ता 10 लक्ष , तरोडा डि येथे रस्ता 40 लक्ष , छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण 5 लक्ष, जाणोरी येथे 14 लक्ष रुपयांचे रस्त्याचे तसेच तालुक्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन बुलढाणा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी कालखेड येथे शिवसेना शाखा स्थापन करून शाखेचे अनावरण करण्यात आले तसेच हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचाराने तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कार्याने प्रभावित होऊन गावाच्या सर्वांगीण विकासाकरिता कालखेड गावाचे सरपंच पवन बरिंगे यांनी बुलढाणा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात अनेक कार्यकर्त्यासह प्रवेश केला जाणोरी येथे सरपंच अर्चना मंगेश ढोले, शाखा प्रमुख सोपान ठाकरे, उप शाखा प्रमुख रामेश्वर काळे, बुध प्रमुख ऋषिकेश टिकार, सचिव आकाश बोरसे, पोलीस पाटील राजू भाऊ टाले, संगितरव बनारसे, पुंडलिक वऱ्हाडे, तुकाराम बोरसे, गोपाल चव्हाण, अरुण घोंगे, मंगेश ढोले, पिंटू ढोले सह शेकडो युवकांनी शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला..
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख शांताराम दाणे, उपजिल्हा प्रमुख राजू पाटील मिरगे, शेगाव तालुका प्रमुख रामा पाटील थारकर, राजेंद्र हेलगे तालुका प्रमुख भाजप, उमेश अवचार जळगाव विधानसभा संघटक, संतोष लीप्ते शेगाव शहर प्रमुख , उप तालुका प्रमुख मोहन लांजुळकर, उप तालुका प्रमुख आशिष मिरगे, गोपाल बोरसे विभाग प्रमुख, निखिल मिरगे, सुयोग जुमडे सोशल मीडिया प्रमुख, गजानन खंडेराव, अक्षय चोखंडे, रमेश तांबडे सागर गुरव, संतोष चोखंडे उपस्थित होते.



