राजकीयसामाजिक

“ग्राम परिवर्तनाची वारी, आमदार आपल्या दारी अंतर्गत वरखेड येथे बांधकाम कामगारांना सेफ्टी कीट चे वितरण! आमदार श्वेता ताईंची संकल्पना..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

(चिखली) आमदार श्वेता ताईं महाले यांच्या मार्गदर्शनाखाली आधार बहुउद्देशीय फाउंडेशनच्या वतीने चिखली मतदारसंघात ग्राम परिवर्तनाची वारी आमदार आपल्या दारी ही संकल्पना गावोगावी राबवली जात आहे. या अंतर्गत विविध लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभ देण्यासाठी आ. श्वेता ताई महाले स्वतः लक्ष घालून प्रयत्न करत आहेत. विविध योजनांपैकी शासनाच्या बांधकाम कामगार कल्याण विभागामार्फत बांधकाम कामगारांना ग्रामदूतांच्या माध्यमातून दि.२ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील वरखेड येथे सेफ्टी किटचे वितरण करण्यात आले.
शेवालय या आ. श्वेता ताई महाले यांच्या कार्यालयामधून”ग्राम परिवर्तनाची वारी आमदार आपल्या दारी”या संकल्पनेच्या माध्यमातून ग्रामदूतांतर्फे मतदार संघातील प्रत्येक गावामध्ये शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जाते. गरजू व पात्र लाभार्थ्यांना संबंधित योजनेचे लाभ मिळावे यासाठी आ. श्वेता ताई महाले जातीने लक्ष घालून या संकल्पनेचा पाठपुरावा करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनानुसार वेळोवेळी ठिकठिकाणी लाभार्थ्यांपर्यंत लाभ देखील पोहोचत असल्यामुळे मतदार संघातील ग्रामीण भागात सर्वसामान्य नागरिक ,शेतकरी, महिला, युवक ,दलित अल्पसंख्यांक आदी विविध समाज घटकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
वरखेड येथे झालेल्या सेफ्टी किट वितरण प्रसंगी गणेश भगत ता. उपाध्यक्ष भाजप, संयोजक भाजपा, रवी भगत शिवसेना उपतालुका प्रमुख, लक्ष्मण शेळके, अरुण गायकवाड ,संदीप म्हस्के, गणेशराव अंभोरे, भारत म्हळसने, विजय येवले, सुधाकर मोरे ,अमोल जाधव, अनिल जाधव ,समाधान कणखर, देविदास कणखर, दत्तात्रय कणखर, इंदुबाई मुंढे, गजानन कणखर, अविनाश भगत, अनिल कणखर, सुनील कणखर, श्रीराम कणखर, दीपक भगत ,मनोहर भगत, विनोद कणखर सरपंच, उपसरपंच महादेव वाकोडे, संदीप मुंढे, पवन कणखर ,उषा कणखर, नंदाबाई वाकोडे, जया कणखर, निळकंठ थाबडे, भारत कणखर, भागवत मुंढे,राजु पांचाळ, आदी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button