महाराष्ट्रसामाजिक

अंधेरा पोलीस स्टेशन हद्दीत जनावरेही सुरक्षित नाहीत! देऊळगाव घुबे शिवारात बैलांची चोरी!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

(चिखली) तालुक्यातील देऊळगाव घुगे शिवारात गोट्यातून दोन बैलं चोरीला गेल्याची घटना काल, ४ फेब्रुवारीला सकाळी उघडकीस आली. मलगी रोड भागात संतोष विश्वनाथ घुबे यांच्या गोठ्यातील गुरांची चोरी झाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल सकाळीच गोठ्यातील बैलांना चारा पाणी देण्यासाठी संतोष घुबे गेले असता अचानक पणे दोन बैलं दिसले नाहीत, त्यामुळे त्यांना धक्काच बसला. देऊळगाव घुबे गावापासून अवघ्या १ किलोमीटर अंतरावर गुरांच गोठ आहे. मागील वर्षी सुद्धा असाच एक प्रकार घडवून गेल्याचे परिसरातील शेतकरी सांगतात. काल मध्यरात्री २-४ वाजेच्या सुमारास घटना घडली असल्याचा शेतकऱ्यांना अंदाज आहे. उपरोक्त ठिकाण अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येतो. मागील काही दिवसांपासून चोरट्यांच्या सुळसुळाट या भागात दिसून येत आहे. त्याचबरोबर चोरीच्या गजब घटना समोर आल्या आहेत. त्याच पैकीच काल झालेली एक घटना आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button