शिवदत्त ज्ञान प्रसारक मंडळ संचालित श्री गणेश विद्यामंदिर, माय मदर इंग्लिश स्कूल, लिलावती कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक समारंभ संपन्न

दिवा – (सचिन शेलवले )
दि.22 फेब्रुवारी 2024 रोजी शिवदत्त ज्ञान प्रसारक मंडळ संचालित श्री गणेश विद्या मंदिर, माय मदर इंग्लिश स्कूल व लिलावती कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक समारंभ संस्थेच्या पटांगणात मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून चित्रपट ,मालिका व नाट्यक्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री रसिका धामणकर व सकाळ वृत्तपत्र समूहाचे श्री. मिलिंद दाभोळकर संस्थेच्या अध्यक्ष लिलावती म्हात्रे , सचिव श्री. साईनाथ म्हात्रे ,संचालिका सौ.केतकी म्हात्रे, सौ .गीता म्हात्रे संचालक श्री.शिवदत्त म्हात्रे , श्री.दिनेश म्हात्रे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्रीराम चौधरी यांनी केले याप्रसंगी माननीय श्रीमती रसिका धामणकर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले त्या म्हणाल्या आपला प्रथम गुरु आई ,दुसरा गुरु शिक्षक यांना कधीही विसरू नका मोबाईलच्या या डिजिटल दुनियेतही तुम्ही खूप वाचन करा वाचनाने आपले ज्ञान समृद्ध करा अनेक पुस्तक ग्रंथ वाचा व आयुष्यात मोठे होऊन शाळेचे नाव वाढवा.
संस्थेचे सचिव श्री .साईनाथ म्हात्रे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आमचे हे सर्व विजेते स्पर्धक आमचा अभिमान आहे. त्यांच्यासाठी संस्थेने वर्षभर विविध उपक्रम राबवून आजचा हा कार्यक्रम आयोजित केला असून संस्थेने विद्यार्थ्यांसाठी भव्य ग्रंथालय व डिजिटल वर्गांची सोय उपलब्ध करून दिली आहे. याप्रसंगी संचालिका सौ.केतकी म्हात्रे, सौ गीता म्हात्रे यांनीही विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री .रविंद्र मोंडूळे ,श्री. ऋषिकेश मोहिते, प्रा. संदेश मोरे यांनी केले तर आभार प्रा. प्रशांत तावडे सरांनी मानले. विजेत्या सर्व स्पर्धकांना सन्मानचिन्ह, मेडल व प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकवृंदाने मेहनत घेतली या कार्यक्रमास विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.



