डॉक्टरकडून गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार….

डॉक्टरकडून गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार….
बदलापूर पश्चिमेतील मांजर्ली परिसरात दिपाली पार्क समोरील साईकृपा सोसायटीमध्ये डॉ. हेमंत सोनवणे याचा दवाखाना आहे. रविवारी दुपारी गतिमंद मुलगी सोनवणे याच्या दवाखान्यासमोरून किराणा दुकानात जात असताना डॉक्टरने तरुणी एकटी असल्याचा गैरफायदा घेत तिला आपल्या दवाखान्यात बोलावले. त्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. बराचवेळ तरुणी घरी परतल्याने तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली असता डॉक्टर सोनवणे याच्या दवाखान्याबाहेर त्या तरुणीची चप्पल आढळली. कुटुंबाने दवाखान्यात प्रवेश केला असता डॉक्टर त्या गतीमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार करताना आढळून आला. त्यामुळे संतापलेल्या पीडित तरुणीच्या कुटुंबाने आरोपी डॉक्टर हेमंत सोनवणे याच्या विरोधात बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये लैंगिक अत्याचार आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.



