बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करू – उपजिल्हाधिकारी सुरेश कवळेजिल्हाधिकारी कार्यालयात एकल महिलांच्या सक्षमीकरणावर विशेष बैठक – संपन्न

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

बुलढाणा, दि. 14 ऑक्टोबर 2026 -*
जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली व निवासी उपजिल्हाधिकारी मा. श्री. सुरेश कवळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामीण भागातील एकल/निराधार/विधवा/परितक्त्या/घटस्फोटित महिलांच्या सक्षमीकरण कार्यक्रमाबाबत विशेष आढावा बैठक पार पडली.
या बैठकीस जिल्ह्यातील सर्व जिल्हास्तरीय विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन, कृषी, वन, रोहयो, DRDA व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत एकल महिलांच्या प्रश्नावर विविध संदर्भीय मुद्द्यांनुसार सविस्तर चर्चा करण्यात आली व त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे जिल्हा प्रशासनाने मान्य केले.
चर्चेतील प्रमुख मुद्दे:*

  1. ग्रामीण भागात रोजगार हमीची कामे तातडीने सुरू करणे.
  2. मध्यवर्ती चारा बँक व मुरघास (Silage) निर्मिती केंद्र सुरू करणे.
  3. भाकड जनावरांसाठी चारा छावणी उभारणे.
  4. एकल महिलांसाठी विविध मार्गदर्शनपर कार्यक्रम राबविणे
  5. असे सर्व महत्त्वाच्य मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली
    तसेच मिशन वात्सल्य सर्व प्रकारच्या योजनांचा लाभ एकल महिलांना प्राधान्याने देण्यात येईल यासाठी सर्व विभागांनी कसोशीने प्रयत्न करावे असे आवाहन उपजिल्हाधिकारी सुरेश कवडे यांनी या आढावा बैठकीत सांगितले कोणत्याही प्रकारची योजना राबवताना एकल महिला लहान बालके यांच्या बाबतीत हलगर्जी पणा करता कामा नये
    अशा सूचना या बैठकीमध्ये सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत
    या बैठकीस मुंबई सह्याद्री दूरदर्शन व आकाशवाणीचे जिल्हा वृत्त प्रतिनिधी तथा साऊ एकल महिला समितीचे जिल्हाध्यक्ष श्री. सचिन ठाकरे,घाटावरील जिल्हा समन्वयक श्री. महेंद्र सौभागे,* शेगाव मिशन वात्सल्य समितीचे सदस्य श्री. प्रभाकर पहुरकर, सामाजिक कार्यकर्त्या तथा मलकापूर मिशन वात्सल्य समितीच्या सदस्या सौ. कोमल सचिन तायडे, प्रा. शाहीन पठाण मॅडम* यांच्यासह विविध महिला संघटनांचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने एकल महिला उपस्थित होत्या.
    यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मा. कवळे साहेब यांनी सांगितले की, एकल महिलांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून, त्यांच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करून लवकरच प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाईल.
    बैठकीचे नियोजन व समन्वय एकल महिला पुनर्वसन समितीच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील एकल महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगार हमीची कामे उपलब्ध करून द्या तसेच त्यांना बचत गटाच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करून चारा टंचाईवर मात करण्यासाठी मोफत बियाण्यांचे वाटप करा त्यासह विविध उपायोजना करण्यासाठी यावेळी साहू एकल महिला समितीच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना एक निवेदन सादर करण्यात आले होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button